डेहराडून - उत्तराखंड राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. उत्तरकाशी जिल्ह्यामध्ये ढगफुटी झाल्याने टोंस नदी काठावरील तिकोची आणि आरकोट येथे बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. ढगफुटीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून ४ गाड्या दरड कोसळल्यामुळे ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
-
Uttarakhand: Indo-Tibetan Border Police (ITBP) is conducting search & rescue operation in Tikochi and Arakot in Uttarkashi district on the banks of river Tons, following cloudburst in the area. One body recovered, 4 vehicles feared trapped under debris. pic.twitter.com/Jk7iaOA9vX
— ANI (@ANI) August 20, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Uttarakhand: Indo-Tibetan Border Police (ITBP) is conducting search & rescue operation in Tikochi and Arakot in Uttarkashi district on the banks of river Tons, following cloudburst in the area. One body recovered, 4 vehicles feared trapped under debris. pic.twitter.com/Jk7iaOA9vX
— ANI (@ANI) August 20, 2019Uttarakhand: Indo-Tibetan Border Police (ITBP) is conducting search & rescue operation in Tikochi and Arakot in Uttarkashi district on the banks of river Tons, following cloudburst in the area. One body recovered, 4 vehicles feared trapped under debris. pic.twitter.com/Jk7iaOA9vX
— ANI (@ANI) August 20, 2019
आरोकोट, माकूडी, तिकोची, किराणु, चीवा, बलावट, यासह १३ गावांमध्ये रविवारी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाण्याच्या प्रवाहामुळे जमिनी देखील वाहून गेल्या आहेत. आपत्ती निवारण पथकाचे सचिव अमित नेगी आणि राज्य आपत्ती निवारण पथकाचे महानिरिक्षक संजय गुंज्याल यांनी हवाई मार्गाने नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली. आज (सोमवारी) मुख्यमंत्री त्रिंवेंद्र सिंह रावत नुकसानग्रस्त गावांचा दौरा करणार आहेत.
इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) आणि आपत्ती निवारण पथकाने बचावकार्य हाती घेतले आहे. परिसरामध्ये ढगफुटी झाल्याने नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. दरडी कोसळल्याने अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक प्रभावित झाली आहे.
जखमींना वाचवण्याला प्राथमिकता देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना हॅलिकॉप्टरने बाहेर काढले जात आहे. माकुडी या गावातून ४ लोकांना हवाई मार्गे डेहराडून येथे हलवण्यात आले. अमित नेगी आणि संजय गुंज्याल यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन येथील मदतकार्याचा आढावा घेतला.