ETV Bharat / bharat

चिदंबरम यांच्या कोठडीत वाढ; दिवसातून एकदा मिळणार घरचे जेवण - आयएनएक्स मीडिया प्रकरण

दिल्ली न्यायालयाने पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. चिदंबरम यांना १७ तारखेपर्यंत तिहारमध्येच रहावे लागणार आहे. सोबतच, दिल्लीच्या रोज अॅव्हेन्यू न्यायालयाने त्यांना दिवसातून एकदा घरचे जेवण देण्यास परवानगी दिली आहे.

चिदंबरम
author img

By

Published : Oct 3, 2019, 5:36 PM IST

नवी दिल्ली - भारताचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सीबीआयने केलेल्या मागणीनुसार, विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहार यांनी हा निर्णय दिला.

पी. चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. याआधी त्यांना ३ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले गेले होते. आज दिल्लीतील न्यायालयाने चिदंबरम यांच्या कोठडीत वाढ करण्याचा निर्णय दिला आहे.दिवसातून एकदा मिळणार घरचे जेवण..आजारी असल्याच्या कारणाने, तुरुंगामध्ये घरचे जेवण मिळावे अशी मागणी चिदंबरम यांनी याआधी केली होती. त्यावर दिल्लीच्या रोज अॅव्हेन्यू न्यायालयाने त्यांना दिवसातून एकदा घरचे जेवण देण्यास परवानगी दिली आहे.
  • Delhi's Rouse Avenue Court allows home cooked food for Congress leader P Chidambaram one time in a day, during his judicial custody. (File pic) pic.twitter.com/kjsjX1Y09J

    — ANI (@ANI) October 3, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी भारताचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना २१ ऑगस्टला अटक करण्यात आली होती. सध्या ते दिल्लीच्या तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत.

हेही वाचा : पुराचा आढावा घेण्यासाठी गेले आमदार, स्वतःच पडले पाण्यात...

Intro:Body:

चिदंबरम यांच्या कोठडीत वाढ; दिवसातून एकदा मिळणार घरचे जेवण

नवी दिल्ली - भारताचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सीबीआयने केलेल्या मागणीनुसार, विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहार यांनी हा निर्णय दिला.

पी. चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. याआधी त्यांना ३ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले गेले होते. आज दिल्लीतील न्यायालयाने चिदंबरम यांच्या कोठडीत वाढ करण्याचा निर्णय दिला आहे.

दिवसातून एकदा मिळणार घरचे जेवण..

आजारी असल्याच्या कारणाने, तुरुंगामध्ये घरचे जेवण मिळावे अशी मागणी चिदंबरम यांनी याआधी केली होती. त्यावर दिल्लीच्या रोज अॅव्हेन्यू न्यायालयाने त्यांना दिवसातून एकदा घरचे जेवण देण्यास परवानगी दिली आहे.

आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी भारताचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना २१ ऑगस्टला अटक करण्यात आली होती. सध्या ते दिल्लीच्या तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.