अजमेर - सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी यांच्या दर्ग्यावर उरूस उत्सव सुरु आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावतीने आज शिवसेना नेते राहुल कनाल यांनी दर्ग्यात चादर चढवली.
दरवर्षी उद्धव ठाकरे आम्हाला घरी बोलवून दर्गावर चादर चढवण्यासाठी देतात. तसेच सर्वांत अगोदर आपली चादर दर्ग्यावर चढवली गेली पाहिजे, असा त्यांचा आग्रह असतो, असे राहुल यांनी सांगितले. देशासह महाराष्ट्रामध्ये शांतता कायम राहावी, हीच आमची पार्थना आहे. ख्वाजा मोइनुद्दीन यांनी दिलेला बंधुत्वाचा संदेश आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करू, असेही राहुल म्हणाले. यावेळी युवा सेना जिल्हा अध्यक्ष मयंक गुप्ता, चंद्रशेखर मनोहर सिंह , राजावत भूपेंद्र सिंह उपस्थित होते.
विश्व विख्यात सुफींच्या चिश्ती या संप्रदायाचे भारतातील संस्थापक सुफींच्या ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी हे मूळचे पर्शिया म्हणजेच इराणचे आहेत. त्यांनी राजस्थानधील अजमेर येथे राहून कार्य केले. त्यांच्या अजमेर येथील गरीब नवाज दग्र्यापुढे लोक अद्यापही नतमस्तक होतात. या दर्ग्याला अनेक नेते भेट देतात.