नवी दिल्ली - अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी काही भागात हळूहळू निर्बंध कमी केले जात आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतर उद्योग पुन्हा सुरू करण्यासंबधित नवीन मार्गदर्शक तत्त्वे गृह मंत्रालयाने जारी केली आहेत. ज्यामध्ये सुरक्षा आणि प्रोटोकॉल सुनिश्चित करा आणि सध्या उद्योगांनी जास्त उत्पादनाचे लक्ष्य ठेवू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे (एनडीएमए) सदस्य सचिव जीव्हीव्ही सरमा यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे. लॉकडाऊन कालावधीत अनेक आठवडे औद्योगिक युनिट बंद पडल्यामुळे काही ऑपरेटरांनी कार्यप्रणालीनचे पालन केले नसेल, याची शक्यता आहे. परिणामी, पाइपलाइन, वाल्व्ह वगैरेमध्ये घातक रसायने असू शकतात, ज्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, असे सरमा यांनी म्हटले आहे.
कंपनीमध्ये स्वच्छता प्रक्रिया चोवीस तास सुरू राहिली पाहिजे. याशिवाय, जेवणाची खोली, कॉमन टेबल हे प्रत्येक दोन ते तीन तासांनी स्वच्छ करावे. तसेच मशिनवर कार्य करताना दक्षता बाळगणे गरजेचे असल्याचे मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटले आहे.