हैदराबाद - तेलंगाणा आरोग्य यंत्रणा कोरोनाशी लढण्यासाठी सक्षम आहे. त्यांच्याकडे पुरेसे टेस्टिंग किट आणि अत्यावश्यक सोयी सुविधा आहे. त्यामुळे तेलंगाणा कोरोनावर मात करत असल्याचे गृहमंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव म्हणाल्या. याबाबतचा अहवाल आयएमसीटीच्या टीमने दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
टीमने गांधी रुग्णालयाला भेट दिली. याठिकाणी कोरोनाच्या सर्व रुग्णांवर उपचार केले जाते. तसेच डिस्चार्ज आणि उपचाराबाबतच्या सर्व नियमांचे पालन केले जात आहे. राज्यातील एकूण रुग्णांपैकी ९३ टक्के रुग्ण या रुग्णालयात उपचार घेत आहेत. तसेच ३०० पेक्षा अधिक रुग्णांची दररोज चाचणी केली जात असल्याचे श्रीवास्त म्हणाल्या.
रुग्णाला चाचणीपासून तर डिस्चार्ज होतपर्यंत ट्रॅक करण्यासाठी आयटी डॅशबोर्डचा वापर केला जात आहे. तसेच टीमने हुमायू नगर येथील कंटेटमेंट झोनला भेट दिली. याठिकाणी देखील सर्व अत्यावश्यक सेवा घरपोच पुरविल्या जात असल्याचे दिसून आले. तसेच पोलीस नागरिकांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचे श्रीवास्तव म्हणाल्या.
तेलंगाणा सरकार गरीबांना निवारा आणि अन्न पुरवठा करून त्यांची व्यवस्थित काळजी घेत आहे. तसेच लॉकडाऊन पालन देखील व्यवस्थिती होत असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत टीमने केंद्राकडे अहवाल सादर केला असल्याचेही त्या म्हणाल्या.