भोपाळ - आपण लोकांच्या वाढदिवसादिवशी केक कापताना पाहिले असेल. मात्र, उज्जैन रेल्वे स्थानकात कुलींनी चक्क नॅरोगेज रेल्वेच्या इंजिनचा अनोखा वाढदिवस साजरा केला. कुली दरवर्षी या इंजिनचा वाढदिवस साजरा करतात. यंदा हे इंजिन 86 वर्षांचे झाले आहे. यावेळी ज्यामुळे इंजिनला पुष्पहारांनी सजावट करून केकही कापण्यात आला. 70 च्या दशकात अरुंद गेज लाईन बंद झाल्यापासून हे इंजिन येथे स्मारक म्हणून ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा - सरसेनाध्यक्षांना पारंपरिक व्यवस्थेत काम करण्यासाठी सहकार्याची गरज
86 वर्षांपूर्वी हे इंजिन उज्जैन येथे आणण्यात आले होते. या इंजिनने नॅरोगेज रेल्वे चालवली जायची. पण जेव्हा नॅरोगेज रेल्वे बंद झाली त्यानंतर इंजिन निष्क्रिय उभे होते. तेव्हा रेल्वे प्रशासनाने स्मारक म्हणून हे इंजिन स्थानक परिसरात ठेवले. येथील कुलींनी या रेल्वेमध्ये काम केले होते. तसेच काहींनी या रेल्वेमध्ये चहा विकला होता. त्यामुळे त्यांच्या या इंजिनच्याबाबतीत वेगळ्या आठवणी आहेत. म्हणूनच ते केक कापत या इंजिनचा वाढदिवस साजरा करतात.
हेही वाचा - केरळ : विधानसभेतील 'सीएए' विरोधी ठरावाला कायदेशीर आधार नाही, राज्यपालांनी फटकारलं
सफी बाबाच्या म्हणण्यानुसार, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी हे नॅरोगेज रेल्वेने प्रवास करत होते. त्यामुळे हे इंजिन येथे ऐतिहासिक आहे.