ETV Bharat / bharat

आज... आत्ता (शुक्रवार २१ जून २०१९ रात्री १२ पर्यंत महत्वाच्या बातम्या) - baba ram rahim

विदर्भासह मराठवाड्यात सायंकाळच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के बसले, त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. माझगाव डाकमधील एका बोटीला आग लागली असून यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर उस्मानाबादमध्ये दहावीत ९४ टक्के गुण मिळवूनही प्रवेश न मिळाल्यामुळे एका विद्यार्थ्यांने आत्महत्या केली आहे. विधानसभेसाठी २८८ जागांवर वंचितनी तयारी केली असून ३० जुलैला पहिला यादी जाहीर होणार आहे. बाबा राम रहीम यांचा पॅरोलसाठी अर्ज असून त्यामध्ये त्यांनी शेती करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आज... आत्ता...
author img

By

Published : Jun 21, 2019, 11:46 PM IST

विदर्भ, मराठवाड्यात भुकंपाचे धक्के, नागरिकात भीतीचे वातावरण

नांदेड - विदर्भासह मराठवाड्यात शुक्रवारी सायंकाळी भुकंपाचे धक्के जाणवले. या भुकंपामुळे कुठलीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याची माहिती आत्तापर्यंत हाती आलेली नाही. मराठवाड्यात नांदेड हिंगोली तर विदर्भात अमरावतीमध्ये भुकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सविस्तर वाचा...

माझगाव डॉकमधील एका बोटीला आग, १ जणाचा मृत्यू

मुंबई - माझगाव डॉकमधील एका बोटीला आग लागल्याची घटना घडली. यामध्ये एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला आहे. राजेंद्र कुमार असे कामगाराचे नाव आहे. याप्रकणी घटनेच्या चौकशीचे माझगाव डॉककडून आदेश देण्यात आले आहेत. सविस्तर वाचा...

धक्कादायक..! दहावीत ९४ टक्के गुण मिळूनही प्रवेश न मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

उस्मानाबाद - जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अल्पवयीन मुलाने आत्महत्या केली आहे. लातूर मधील शाहू कॉलेजला प्रवेश मिळेल की नाही या नैराश्यातून अक्षय शहाजी देवकर या 16 वर्षीय मुलाने आत्महत्या केली. अक्षयला दहावीत 94.20 टक्के गुण मिळाले मात्र कॉलेज प्रवेशाच्या चिंतेतून त्याने आत्महत्या केल्याने देवळाली या गावावर शोककळा पसरली आहे. सविस्तर वाचा...

विधानसभेसाठी २८८ जागांवर वंचितची तयारी; ३० जुलैला येणार पहिली यादी

मुंबई - विधानसभेसाठी अद्याप कुठल्याही पक्षाशी संपर्क साधला नाही. २८८ जागांसाठी वंचितची तयारी आहे आणि त्यासाठी ३० जुलैला पहिली यादी जाहीर करणार असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसेच राज्यात वंचित बहुजन आघाडीला दोन अंकी जागा मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. शहरात आज वंचित बहुजन आघाडीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सविस्तर वाचा...

बाबा राम रहीम यांचा पॅरोलसाठी अर्ज, म्हणाले शेती करायची आहे
चंदीगड - स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आणि डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम याने पॅरोलसाठी कारागृह प्रशासनाकडे अर्ज केला आहे. आपल्याला शेती करायची असल्याचे कारण सांगत त्याने पॅरोल मागितला आहे. त्यांच्या या मागणीवर तुरुंग अधिक्षकांनी सिरसाचे पोलीस आयुक्तांना पत्र लिहुन कायदेशीर बाबींवर सल्ला मागितला आहे. शेती करण्यासाठी गरमीत राम रहिमने ४२ दिवसांची पॅरोल मागीतली आहे. सविस्तर वाचा...

sample description
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.