चंदीगड - हरियाणामध्ये भाजप आणि काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचार सुरू आहे. उद्या (रविवार) भारतीय जनता पक्ष सकाळी १० वाजता निवडणूक जाहीरनामा प्रकाशित करणार आहे. हरियाणाचे भाजप प्रदेश उपाध्यक्ष अरविंद यादव आणि केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रदर्शित करण्यात येणार आहे.
मागीलवर्षी राजस्थान, मध्यप्रदेश आणि हरियाणा राज्यामध्ये कर्जमाफीच्या मुद्द्यावरून काँग्रेस सरकार सत्तेत आले होती. काँग्रेसने याही निवडणुकीत कर्जमाफीचा मुद्दा घोषणापत्रात घेतला आहे. त्यामुळे भाजपच्या जाहीनाम्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - 'कुठे नेऊन ठेवलाय आमचा महाराष्ट्र?'
काँग्रेसने ज्या प्रकारे जाहीरनाम्यातून शेतकरी, सरकारी कर्मचारी, आणि महिलांच्या योजनासंबधी घोषणा केली आहे. त्यामुळे भाजपवरही तशाच घोषणा करण्याचा दबाव आहे, असे भाजमधील सुत्रांकडून माहिती मिळाली आहे. मात्र, जे शक्य असतील तेच मुद्दे जाहीरनाम्यात देण्यासाठी भाजप आग्रही आहे.
काँग्रेस सरकारच्या काळात सरकारी नोकऱ्यांमध्ये भ्रष्टाचार केला जात होता. मात्र, मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्त्वाखाली सरकारी नोकऱयांमध्ये पारदर्शिपणा आल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले. भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यात सरकारी नोकऱ्यांमध्ये पारदर्शिपणा, समान विकासाच्या संधी, अर्ज करताच बदलीची सुविधा यासारखे मुद्दे असण्याची शक्यता आहे. मनोहर लाल खट्टर यांनी निवडणूक प्रचारादरम्यान अनेक वेळा या विषयांचा उल्लेख केला आहे.
हेही वाचा - 'काँग्रेस अध्यक्षांनी कधीचेच मैदान सोडले, तर राष्ट्रवादी खाली होण्याच्या मार्गावर'
महिलांना खुश करण्यासाठी काँग्रेसने सरकारी नोकऱ्यांमध्ये ३३ टक्क्यांचे प्रलोभन दिले आहे. यासह मोफत वीज, प्रत्येक जिल्ह्यात अत्याधुनिक रुग्णालय आणि विश्वविद्यालय बांधण्याचा दावा केला आहे.