गुवाहाटी - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. आसामध्ये लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या 43 दिवसांमध्ये तब्बल 4 हजार 300 लोकांना अटक करण्यात आली आहे. दंड म्हणून अटक केलेल्या व्यक्तींकडूनसुमारे 2 कोटी 18 लाख 89 हजार 550 रुपये वसूल करण्यात आल्याचे आसाम पोलिसांनी सांगितले.
राज्यातील विविध भागांतून सर्व प्रकारच्या 25 हजार 426 वाहने जप्त करण्यात आली आहेत. याचबरोबर सोशल मीडियावर कोरोनासंबधित अफवा पसरवणाऱयांवरही कारवाई करण्यात येत आहे. याप्रकरणी 96 गुन्हे दाखल करण्यात आले असून 50 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती अधिकृत निवेदनात देण्यात आली आहे.
कोरोनाचा फैलाव वेगानं होत असून अनेक देशामध्ये हाहाकार माजला आहे. परंतू, सरकारनं वेळीच पावलं उचलल्याने त्याचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, अवघा देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. घराच्या दारात लक्ष्मण रेषा ओढून ठेवा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना केलं आहे.