ETV Bharat / bharat

मोराला खाऊ घालण्यातून वेळ मिळाला, तर चीनकडेही लक्ष द्या; ओवेसींचा खोचक टोला - एमआयएमचे प्रमुख

एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. कदाचीत जेव्हा त्यांना मोराला दाणे खाऊ घालण्यातून वेळ मिळेल, तेव्हा त्यांना देशातील लोकांना सांगायला वेळ मिळेल आणि चीनचं नाव घेण्याची हिंमत करतील, असे टि्वट ओवेसी यांनी केले आहे.

खासदार असदुद्दीन ओवेसी
खासदार असदुद्दीन ओवेसी
author img

By

Published : Sep 10, 2020, 6:00 PM IST

नवी दिल्ली - काही दिवसांपूर्वी मोराला दाणे खाऊ घालतानाचा एक व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्‍टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडिओवरूनच एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. चीन-भारत सीमा तणावावर मोदींनी भाष्य केलेलं नाही. कदाचीत जेव्हा त्यांना मोराला दाणे खाऊ घालण्यातून वेळ मिळेल, तेव्हा त्यांना देशातील लोकांना सांगायला वेळ मिळेल आणि चीनचं नाव घेण्याची हिंमत करतील, असे टि्वट ओवेसी यांनी केले आहे.

  • May be, when he is free from feeding peacocks, he will have the time to tell the people of this country and also generate courage to mention China by name. [2/2]

    — Asaduddin Owaisi (@asadowaisi) September 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आपले सैन्य सीमेवर पीएलएचा सामना करत आहेत. हे संकट फक्त लष्करापूरतं राहिल नाही. हे देशाच्या सर्वोच्च राजकीय नेतृत्वाबद्दल आहे. जे कोणतीही कृती करताना दिसत नाही. गेल्या काही आठवड्यांपासून देशाचे पंतप्रधान मुद्यांवर का बोलत नाहीत. कदाचीत जेव्हा त्यांना मोराला दाणे खाऊ घालण्यातून वेळ मिळेल, तेव्हा त्यांना देशातील लोकांना सांगायला वेळ मिळेल आणि चीनचं नाव घेण्याची हिंमत करतील, असे टि्वट ओवेसींनी केले आहे.

दरम्यान, आज अंबाला हवाईतळावर लढाऊ विमान राफेलचा औपचारिकरित्या भारतीय हवाईदलात समावेश झाला आहे. राफेलचा समावेश भारतीय वायूदलातील 17 स्क्वाड्रनमध्ये होणार आहे. त्याला गोल्डन अॅरो नावाने संबोधण्यात येणार आहे. कार्यक्रमात फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होती. राफेलचा समावेश करताना सर्वधर्म पूजा करण्यात आली. यावेळी विविध विमानांच्या कसरतींचे सादरीकरण करण्यात आले. तसेच तेजस विमानांसह ‘सारंग'ने हवाई चमूने चित्तथरारक हवाई कसरती सादर केल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.