इटानगर ( अरुणाचल प्रदेश) - अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक ही लोकसभा निवडणुकीसोबतच झाली. अरुणाचल प्रदेशच्या विधानसभेच्या ६० जागांवर लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात मतदान घेण्यात आले. ज्याचा आज निकाल लागणार आहे.
यंदा राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या काँग्रेस आणि भाजपच्या दरम्यान मुख्य लढत होणार आहे. परंतु कोनराड संगमा यांच्या नेतृत्वाखाली एनपीपी, पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेश आणि जनता दल (सेक्युलर) यांनी सुध्दा आव्हान उभे केले आहे.
विधानसभा निवडणूकित राज्यभरातील २२०२ पोलींग बूथवर सात लाख ९४ हजार १६२ मतदारांनी मतदान केले. ज्चात जार लाख १६ हजार महिला मतदारांचा समावेश होता.
LIVE :
०२.०० pm- भाजपला ४२ जागांवर आघाडी, काँग्रेस ९ जागांवर पुढे. इतर पक्षांची ८ जागांवर आघाडी
१२.०5 pm- भाजप ४० जागांवर पुढे तर काँग्रेसला १२ जागांवर आघाडी इतर पक्ष सहा जागांवर पुढे
११.३० am - भाजप ४२ जागांवर पुढे तर काँग्रेसला १२ जागांवर आघाडी इतर पक्ष पाच जागांवर पुढे
११.०० am - भाजपला २३ जागांवर आघाडी, काँग्रेस १० जागांवर पुढे, इतर पक्षांना पाच जागांवर आघाडी
१०.०० am - भाजपची सात जागांवर आघाडी