ETV Bharat / bharat

भारत-चीन सीमा तणाव; अजित डोवाल आणि चीनी परराष्ट्र मंत्र्यांची चर्चा..

सीमा भागामध्ये शांतता राखण्यासाठी, आणि गलवानमध्ये झालेल्या प्रकाराची पुनरावृत्ती न होऊ देण्याबाबत या दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

author img

By

Published : Jul 6, 2020, 3:14 PM IST

Amid LAC standoff, Ajit Doval chairs meeting with Chinese Foreign Minister
भारत-चीन सीमा तणावाबाबत अजित डोवाल आणि चीनी परराष्ट्र मंत्र्यांची चर्चा..

नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासोबत चर्चा केली. यामध्ये त्यांनी भारत-चीन सीमा तणावाबाबत बोलणी केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. व्हिडिओ कॉलमार्फत ही चर्चा पार पडली.

सीमा भागामध्ये शांतता राखण्यासाठी, आणि गलवानमध्ये झालेल्या प्रकाराची पुनरावृत्ती न होऊ देण्याबाबत या दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, गलवान खोऱ्यात भारत-चीन सीमेवरील तणावानंतर आता चीन लष्काराने एलएसीवरून(प्रत्यक्ष सीमा रेषेवरून) त्याचे तंबू हटवले आहेत. त्यांची वाहनेही सीमारेषेपासून 1 ते 2 किलोमीटर मागे घेतली असल्याची माहिती भारतीय लष्करांच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. चिनी लष्कराची काही अवजड वाहने अद्यापही गलवान नदीच्या खोऱ्यातच आहेत. मात्र, भारतीय लष्कर त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहेत.

हेही वाचा : भारत-चीन संघर्ष : अकाली विजय जाहीर करणे अविवेकी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.