नवी दिल्ली - लॉकडाऊन'मुळे नागरिक घरात आहेत. रस्त्यावर केवळ आवश्यक कामासाठी बाहेर निघणार्या व्यक्ती आहेत. शहरातील रस्ते पूर्णत: निर्जन झाले आहेत. याचा फायदा देशातील धार्मिकदृष्ट्या पवित्र नर्मदा नदीला झाला आहे. नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारली असून पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाणही जास्त आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. केंद्र सरकारनं यासाठी विशेष प्रयत्नही सुरू केले आहेत. पण, नदीच्या पाण्यात फारशी सुधारणा झाली नव्हती. मात्र, लॉकडाउनमुळे गेल्या 40 दिवसांमध्ये पाण्याची गुणवत्ता सुधारली आहे. लॉकडाऊनमुळे ओंकारेश्वरच्या सर्व घाटांवर भाविकांची गर्दी नाही. परंतु तरीही येथे एक अलौकिक शांतता अनुभवली जात आहे. लॉकडाऊनमुळे नर्मदेच्या स्थितीत बरेच सुधार झाले आहेत.
दरम्यान लॉकडाऊनमुळे पृथ्वी आता स्थिर झाली असून पृथ्वीचे कंप कमी झाले आहेत. म्हणजेच, संपूर्ण जगात ध्वनी प्रदूषण कमी झाले आहे. सामान्य दिवसांमध्ये पृथ्वीचा थरकाप दिवसेंदिवस वाढत असे. रात्री कमी असायचा. लॉकडाऊन झाल्यापासून पूर्वी थरथर कापत नाही असा शास्त्रज्ञांना शोध लागला आहे.