ETV Bharat / bharat

मोदींच्या भाषणानंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या अंमलबजावणीसाठी बैठक

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्रत्येक गरीब कुटुंबाला 5 किलो गहू किंवा तांदुळ आणि 1 किलो हरभरा देण्यात येणार आहे. 5 महिने म्हणजे नोव्हेंबरपर्यंत ही योजना आता सुरू राहणार आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jun 30, 2020, 9:15 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज(मंगळवार) देशवासियांना संबोधित केले. तीन महिने मोफत धान्य दिल्यानंतर आणखी 5 महिने 80 कोटी गरिबांना मोफत राशन देण्यात येईल, असा मोठा निर्णय मोदींनी घेतला. त्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीतील नॉर्थ ब्लॉकमध्ये मंत्रीगटाची बैठक घेतली.

गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. अर्थमंत्री निर्मला सितारामन, कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर, पियुष गोयल आणि नागरी अन्न पुरवठा मंत्री राम विलास पासवान या बैठकीला उपस्थित होते. सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान बैठकीला सुरुवात झाली. मोदींच्या भाषणानंतर शहांनी बैठक बोलावली होती. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची अंमलबजावणी कशी करायची यावर मंत्री गटाची चर्चा झाली.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्रत्येक गरीब कुटुंबाला 5 किलो गहू किंवा तांदुळ आणि 1 किलो हरभरा देण्यात येणार आहे. 5 महिने म्हणजे नोव्हेंबरपर्यंत ही योजना आता सुरु राहणार आहे. या योजनेवर सरकारचे 90 हजार कोटी रुपये खर्च होणार आहे. मागील तीन महिन्यांपासून ही योजना सुरू आहे. त्यामुळे सरकारचा या योजनेवर एकूण खर्च 1 लाख 5 हजार कोटी रुपये होणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.