ETV Bharat / bharat

केरळ येथील आनयुट्टू उत्सव; ७० हत्तींना भरवण्यात आले औषधीयुक्त खाद्यपदार्थ - kerala

आनयुट्टू उत्सव म्हणजे हत्तींसाठी एक धार्मिक अनुष्ठान उत्सव आहे. हा उत्सव प्रसिद्ध वडकुंनाथ मंदिराच्या परिसरात साजरा केला जातो. यावर्षीही या उत्सवात जवळपास ७० हत्तींना भाविकांना मोठ्या संख्येने औषधीयुक्त खाद्यपदार्थ भरवून हा उत्सव साजरा करण्यात आला.

आनयुट्टू
author img

By

Published : Jul 22, 2019, 11:52 AM IST

थ्रिसुर - जिल्ह्यातील वडकुंनाथ मंदिरात रविवारी आनयुट्टू उत्सव साजरा करण्यात आला. हा उत्सव दरवर्षी साजरा करण्यात येत असतो. या उत्सवाचे महत्व म्हणजे यात उपस्थित हत्तींना पोषक असे खाद्यपदार्थ खाऊ घातले जातात

आनयुट्टू, हत्तींसाठी एक धार्मिक अनुष्ठान उत्सव आहे. हा उत्सव भगवान शिव यांना समर्पित असलेल्या प्रसिद्ध वडकुंनाथ मंदिराच्या परिसरात साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा उत्सव रविवारी वडकुंनाथ मंदिरातील आवारात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये एका रांगेत उभे असलेल्या जवळपास ७० हत्तींना भाविकांनी मोठ्या संख्येने खाद्य पदार्थ भरविले. हा उत्सव हिंदु सणातील एक महत्वाचा उत्सव असून तो गणपतीची स्थापना करण्यासाठी या उत्सवाचे आयोजन केले जाते.

यावर्षीच्या उत्सवात १०,००८ नारळ, २,५०० किलो पोहे, २,५०० किलो गुळ, ३०० किलो मुरमुरे, १५० किलो तीळ, १५० किलो तुप आणि ऊस इतके खाद्य पदार्थ हत्तींना भरवण्यात आहे. याव्यतिरिक्त ५०० किलो हळद मिश्रीत तांदुळ, गुळ, तेल आणि ९ प्रकारच्या फळांचाही भोग हत्तींना लावण्यात आला. यावर्षीच्या उत्सवात ७ मादा हत्तींनी सुद्धा सहभाग नोंदविला होता.

उत्सवाला उपस्थित असलेल्या हत्तींमधील सर्वात लहान हत्तीला मंदिरातील मुख्य पुजारी मेलासांथी अनिमंगलम रामन नंबुदीरी यांचे हस्ते पदार्थ खाऊ घालून या उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या मेजवानीनंतर पाचनास मदत व्हावी म्हणून हत्ती उपचार तज्ञाच्या मार्गदर्शनानुसार हत्तींना आयुर्वेदिक औषधी वनस्पती देखील देण्यात आली.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.