ETV Bharat / bharat

आपल्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या 'विवेक'ची कहाणी एकदा ऐकाच... - विवेक जोशी

मुंबई विमानतळावर विवेक यांना तिथल्या कर्मचाऱ्यांकडून दुय्यम वागणूक मिळाली. यानंतर त्यांनी दिव्यांग लोकांना आवश्यक त्या सुविधा मिळण्यासाठी आवाज उठवला. अखेर एअर इंडियाने विवेक यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्ंयावर लक्ष दिले आणि दिव्यांग तसंच ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक त्या सुविधा उपब्ध करुन देण्याबाबत नवीन निर्देश जारी केले.

दिव्यांग प्रवाशांच्या हक्कासाठी त्याने दिला लढा

author img

By

Published : Sep 25, 2020, 6:03 AM IST

जालंधर (पंजाब) : अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी माणसं समाजात फार कमी आहेत. यातीलच एक व्यक्तिमत्व म्हणजे विवेक जोशी. त्यांनी विमानतळावर दिव्यांग लोकांना आवश्यक त्या सुविधा मिळवून देण्यासाठी आवाज उठवला.

शारीरिक समस्येमुळे विवेक यांना चालणं-बोलणंही कठीण जातं. मात्र, अशा परिस्थितही हार न मानता त्यांनी एलएलबी, एलएलएम, एमबीएसारख्या पदवी प्राप्त करुन स्वत:ला सिद्घ केले. सध्या ते पीएचडी करत आहेत. आपल्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या विवेक जोशींना दोनदा राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

मुंबई विमानतळावर विवेक यांना तिथल्या कर्मचाऱ्यांकडून दुय्यम वागणूक मिळाली. यानंतर त्यांनी दिव्यांग लोकांना आवश्यक त्या सुविधा मिळण्यासाठी आवाज उठवला. विवेकच्या वडिलांनी या लढ्यात त्यांना पाठिंबा दिला. अखेर एअर इंडियाने विवेक यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्ंयावर लक्ष दिले आणि दिव्यांग तसंच ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक त्या सुविधा उपब्ध करुन देण्याबाबत नवीन निर्देश जारी केले. अशाप्रकारे विवेकला त्यांच्या मेहनतीचे फळदेखील मिळाले.

विमानतळावर घडलेल्या एका घटनेने विवेकचे संपूर्ण जीवन बदलून टाकले. पण, त्यासह कित्येक दिव्यांग नागरिकांना त्यांच्या न्याय आणि हक्कासाठी लढण्याची ताकदही मिळाली. दिव्यांग लोकांच्या सबलीकरणासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे विवेक यांना तत्कालिन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच, विवेक यांना उच्चशिक्षीत करुन दिव्यांग नागरिकांच्या हक्कासाठी आवाज उठवण्यास सक्षम करणाऱ्या त्यांच्या आईलाही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले.

स्वत:पुरता विचार करणारी माणसं जगात अनेक आहेत. परंतु, विवेक जोशी आणि त्यांच्या वडिलांसारखी माणसं आपल्याला क्वचितच पाहायला मिळतील. त्यांनी दिलेल्या लढ्यामुळेच अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला. त्यांच्या या कार्यामुळे आज कित्येक लोकांना आपल्या हक्कासाठी आवाज उठवण्याची प्रेरणाही मिळाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.