गुंटूर - आंध्र प्रदेशमधील एका महिलेचे वयाच्या ७३ वर्षी आई होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. लग्नाच्या 57 वर्षांनंतर त्यांनी आज जुळ्यांना जन्म दिला आहे. यापूर्वी 70 वर्षाच्या महिलेनं मुलाला जन्म दिल्याचा जागतिक विक्रम होता. या प्रसूतीनंतर मंगयाम्मा यांनी हा विक्रम मोडला आहे.
१९६२ मध्ये पूर्व गोदावरी जिल्ह्यातील यारमत्ती रामराजा राव यांच्याशी मंगयाम्माचे लग्न झाले होते. शेतकरी कुटुंब असलेल्या यारमत्ती रामराजा राव आणि मंगयाम्मा यांना मुलं होत नव्हती. २०१८ मध्ये त्यांनी गुटुंरमधील अहिल्या रुग्णालयाशी संपर्क साधला आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले.
मंगयाम्मा यांना रुग्णालयात विशेष एका खोलीत वैद्यकीय सेवा देण्यात आली. त्यांनी उतारवयात येणाऱ्या शारीरिक समस्यावर मात करत आपले आई होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. शरीरात साखरेचे आणि योग्य रक्तदाबाची कमतरता असतानाही गर्भाशयात बाळाची निरोगी वाढ झाली. प्रसृतीनंतर बाळ आणि आई दोघांचेही आरोग्य चांगले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.