इंदौर - भाजपचे चार आमदार आमच्या संपर्कात आहेत. कमलनाथ यांचा आदेश आल्यानंतर त्यांना सरकारमध्ये सामील करून घेण्यात येईल असे कम्प्युटर बाबा म्हणाले आहेत. इंदौर येथे बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.
भाजपचे चार आमदार संपर्कात असल्याचा दावा मध्यप्रदेशमधील कम्प्युटर बाबाने केला आहे. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी त्याच्या नावांची घोषणा करेन, असे ते म्हणाले आहेत. त्यांच्या या दाव्याने मध्यप्रदेशमध्ये राजकीय खळबळ माजली आहे.
मध्य प्रदेशातही कर्नाटकप्रमाणे राजकीय नाट्य रंगण्याची चिन्हे आहेत. मध्यप्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला त्यांच्या दोन आमदारांनी दणका दिला आहे. दोन्ही आमदारांनी विधेयकावर मतदानाच्यावेळी काँग्रेसच्या बाजूने मतदान केले आहे. नारायण त्रिपाठी आणि शरद कोल या दोन भाजप आमदारांनी काँग्रेसला समर्थन दिले आहे.
दोन्ही आमदार भाजप सोडून काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. आपल्या विधानसभा क्षेत्राचा विकास करायचा आहे. त्यामुळे आम्ही कमलनाथ यांना समर्थन दिले असल्याचे त्यांनी म्हटले.