नवी दिल्ली - देशभरामध्ये काल (सोमवार) पर्यंत 2 लाख 31 हजार 902 संभाव्य कोरोनाग्रस्तांची चाचणी घेण्यात आल्याची माहिती इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिली आहे. याबरोबरच 37 लाख रॅपिड चाचणी किटची ऑर्डर दिली असून लवकरच ते किट भारताला मिळणार आहेत, असे आर गंगाखेडकर यांनी सांगितले.
याशिवाय अतिरिक्त 33 लाख आरटी-पीसीआर कीट भारताने मागवले आहेत. तेही लवकरच आपल्याला मिळणार आहेत. काल आम्ही सांगितल्यानुसार टेस्ट किट सहा आठवडे पुरतील एवढे भारताकडे आहेत. आणखी काही कीटही लवकर मिळणार आहेत. त्यामुळे अनेक दिवस आपल्याला अडचण येणार नाही, असे गंगाखेडकर म्हणाले.
भारतामध्ये आत्तापर्यंत 10 हजार 363 कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 1 हजार 36 जण पूर्णत: बरे झाले असून 339 जणांचा मृत्यू झाला आहे.