ETV Bharat / bharat

तबलिगी जमातीचे 1,277 जण हरियाणात दाखल, मनोहरलाल खट्टर यांची माहिती

author img

By

Published : Apr 3, 2020, 12:19 PM IST

दिल्लीच्या निजामुद्दीनमधील तबलिगी जमात पैकी 1277 लोक हरियाणामध्ये पोहचली आहेत. या बातमीने राज्यात खळबळ उडाली आहे. या 1277 जणांपैकी 107 जण विदेशी आहेत. हे विदेशी पर्यटक धर्माचा प्रसार करण्यासाठी आले होते. राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी ही माहिती दिली आहे.

1277 tableegi jamaat markaj follwers in haryana update

चंदीगढ - दिल्लीच्या निजामुद्दीनमधील तबलिगी जमात पैकी 1277 लोक हरियाणामध्ये पोहचली आहेत. या बातमीने राज्यात खळबळ उडाली आहे. या 1277 जणांपैकी 107 जण विदेशी आहेत. हे विदेशी पर्यटक धर्माचा प्रसार करण्यासाठी आले होते. राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी ही माहिती दिली आहे.

तबलिगी मरकझमध्ये सहभाग घेतलेल्या अनेकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तसेच अनेक परदेशी लोकांचे पासपोर्टही जप्त केले आहेत. तसेच 725 लोकांना अलग ठेवण्यात आले आहेत. हे पर्यटक बांगलादेश, इंडोनेशिया, श्रीलंका, नेपाळ, दक्षिण आफ्रिका आणि मलेशियार येथून आले असल्याची माहिती खट्टर यांनी दिली.

मरकझमध्ये सामील झालेल्या सहा जणांचाही तेलंगाणामध्ये मृत्यू झाला आहे. येथील 24 लोकांना संसर्ग झाल्याचे आढळले आहे. 441 संशयितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मरकझमधील काही लोक उत्तर प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह देशातील अनेक राज्यांत पोहोचले आहेत.

  • 13 मार्च - तबलिगी मरकझ जमातने दिल्लीतील निजामुद्दीन भागात धार्मिक कार्यक्रम आयोजित केला. तीन हजार चारशे लोक यात सहभागी झाले होते.
  • 16 मार्च - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 50 हून अधिक लोकांच्या उपस्थितीत सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातली. असे असूनही निजामुद्दीनमध्ये आयोजित धार्मिक कार्यक्रम चालूच होता.
  • 20 मार्च - इंडोनेशियातील 10 लोक तेलंगणामध्ये कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले.
  • 22 मार्च - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात सार्वजनिक कर्फ्यू लागू करण्याचे आवाहन केले.
  • 24 मार्च - पंतप्रधान मोदींनी 21 दिवस देशव्यापी लॉकडाउनची घोषणा केली. यामध्ये सर्व जाहीर सभा आणि कोणत्याही प्रकारच्या अनावश्यक हालचालींवर बंदी घालण्यात आली होती. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यास परवानगी होती. निजामुद्दीन पोलिसांनी उर्वरित लोकांना मरकझ परिसर रिकामा करण्यास सांगितले.
  • 25 मार्च - प्रशासनाचा आदेश असूनही सुमारे 1 हजार लोक या भागात वास्तव्यास होते. वैद्यकीय पथकाने मरकझला भेट दिली आणि कोरोनाबाधितांना वेगळे केले.
  • 26 मार्चः दिल्ली येथे झालेल्या या कार्यक्रमात भाग घेणार्‍या व्यक्तीचा श्रीनगरमध्ये कोरोनाबाधा झाल्याने मृत्यू झाला.
  • 27 मार्च - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची संभावना असलेल्या मरकझ येथून वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आणि नंतर हरियाणाच्या झज्जरमध्ये निरक्षणाखाली ठेवण्यात आले.
  • 28 मार्च - जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) टीमने एसडीएमसमवेत मारकझला भेट दिली. दिल्लीच्या राजीव गांधी कर्करोग रुग्णालयात मरकझच्या 33 जणांना वेगळे ठेवले. लाजपत नगरच्या पोलीस आधिकाऱयांनी मरकझ खाली करण्याची नोटीस बजावली.
  • 29 मार्च - मरकझच्या अधिकाऱयांनी नोटीसला उत्तर देताना सांगितले की, लॉकडाऊन झाल्यानंतर कोणत्याही नवीन व्यक्तीला मरकझमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. येथे उपस्थित असलेले सर्व जण लॉकडाऊन होण्याच्या आधीपासून मरकझ आहेत. पोलीस आणि आरोग्य विभागाने मरकझमधील लोकांना बाहेर काढले आणि विलगीकरण कक्षात पाठवले.
  • दिल्लीतील निजामुद्दीन येथे 'मरकज' हा धार्मिक प्रार्थनेचा कार्यक्रम 13 मार्च ते 15 मार्चदरम्यान आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शेकडो लोक सहभागी झाले होते. यातील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. यातील 6 जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. यात तेलंगाणामधून गेलेल्या काही जणांचा समावेश होता

दिल्लीतील निजामुद्दीन येथे 'मरकज' हा धार्मिक प्रार्थनेचा कार्यक्रम 13 मार्च ते 15 मार्चदरम्यान आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शेकडो लोक सहभागी झाले होते. यातील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. यातील 6 जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. यात तेलंगाणामधून गेलेल्या काही जणांचा समावेश होता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.