ETV Bharat / bharat

बंगालमधील 107 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार ; 'या' नेत्याचा दावा

बंगालमधील 107 आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा भाजपा नेते मुकुल रॉय यांनी केला आहे.

बंगालमधील 107 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार ; 'या' नेत्याचा दावा
author img

By

Published : Jul 13, 2019, 7:03 PM IST

कोलकाता - तृणमूल काँग्रेस, सीपीएम आणि काँग्रेस या पक्षांचे मिळून तब्बल 107 आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा भाजप नेते मुकुल रॉय यांनी केला आहे.

  • Mukul Roy, BJP in Kolkata: 107 West Bengal MLAs from CPM, Congress and TMC will join BJP. We have their list prepared and they are in contact with us pic.twitter.com/SJ48v5WHMW

    — ANI (@ANI) July 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सध्या गोवा आणि कर्नाटकमध्ये राजकीय नाट्य सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकारण देखील ढवळून निघाले आहे. 'विरोधी पक्षांचे १०७ आमदार हे येत्या काही दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार असून ते आमदार आमच्या संपर्कात आहेत', अशी माहिती आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये बोलताना भाजपा नेते मुकुल रॉय यांनी दिली आहे.

तृणमुल काँग्रेस, काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या आमदारांचा यामध्ये समावेश असल्याचे त्यांनी सांगितले आहे. रॉय यांच्या या वक्तव्यामुळे बंगालमधील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक घटना घडत असतात.

Intro:Body:

news

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.