ETV Bharat / bharat

Opposition Meeting : विरोधी आघाडीचे नाव ठरले, 2024 मध्ये 'INDIA' विरुद्ध 'NDA' सामना रंगणार - इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इनक्लुझिव्ह अलायन्स

विरोधी आघाडीची दुसरी बैठक सोमवारपासून बेंगळुरूमधील एका खासगी हॉटेलमध्ये सुरू होती. या बैठकीत महाआघाडीसाठी चार नावे सुचविण्यात आली. यापैकी एक नाव फायनल करण्यात आले आहे.

Opposition Meeting
विरोधकांची बैठक
author img

By

Published : Jul 18, 2023, 3:49 PM IST

Updated : Jul 18, 2023, 5:09 PM IST

पहा व्हिडिओ

बेंगळुरू : विरोधी पक्षांच्या आघाडीचे नाव INDIA (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इनक्लुझिव्ह अलायन्स) असणारे आहे. या नावावर सर्व नेत्यांची सहमती झाली आहे.

  • आज बेंगळूरू येथे विरोध पक्षांच्या बैठकीसाठी उपस्थित राहिलो . यावेळी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री… pic.twitter.com/B9G9LcTEPM

    — Sharad Pawar (@PawarSpeaks) July 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बैठकीत 25 पक्षांचे नेते सहभागी : काँग्रेसच्या उपस्थितीत, विरोधी आघाडीची दुसरी बैठक सोमवारपासून बेंगळुरूमधील एका खासगी हॉटेलमध्ये सुरू होती. या बैठकीत किमान 25 पक्षांचे 46 हून अधिक नेते सहभागी झाले होते. बैठकीत महाआघाडीसाठी चार नावे सुचविण्यात आली. प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक अलायन्स (पीडीए), यूपीए 3, नॅशनल प्रोग्रेसिव्ह अलायन्स (एनपीए) आणि इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स (इंडिया) या नावांचा समावेश आहे.

हे प्रमुख नेते बैठकीत सहभागी झाले : 2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती तयार करण्यासाठी ही बैठक महत्त्वाची आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आरजेडीचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव, आरजेडी नेते तेजस्वी यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, सपा सुप्रीमो अखिलेश यादव, सीताराम येचुरी, ओमर अब्दुल्ला, डी राजा, वायको, उद्धव ठाकरे, मेहबुबा मुफ्ती इत्यादी नेते या बैठकीत सहभागी झाले होते.

या मुद्यांवर चर्चा झाली: या बैठकीत सहा महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. समान किमान कार्यक्रम तयार करण्यासाठी उपसमिती स्थापन करण्यावर चर्चा केली गेली. तसेच युतीच्या संयुक्त कार्यक्रमांच्या नियोजनासाठी उपसमिती स्थापन करण्यावर चर्चा झाली. देशभरात कुठे मोर्चे काढायचे, अधिवेशन कुठे करायचे, केंद्र सरकारविरोधात जनआंदोलन कसे करायचे, या सर्व कार्यक्रमांची जबाबदारी ही समिती सांभाळणार आहे. विरोधी आघाड्यांमधील जागावाटपाबाबत गंभीर चर्चा होणार आहे. राज्यात जो पक्ष मजबूत असेल त्याला अधिक मान्यता मिळणार आहे. या सोबतच ईव्हीएमच्या मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली जाईल. चर्चेनंतर निवडणूक आयोगाला काही सूचना केल्या जातील.

हेही वाचा :

  1. NDA Meeting : यूपीए विरोधात काय आहे भाजपचा 'काउंटर प्लॅन'? विरोधकांच्या ऐक्याला असे देणार आव्हान

Last Updated : Jul 18, 2023, 5:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.