मुंबई भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 हा युनायटेड किंगडम (यूके)च्या संसदेने पारित केलेला कायदा होता ( Indian Independence Day ) . ज्यानुसार ब्रिटन शासित भारत देश हा भारत आणि पाकिस्तान या दोन स्वतंत्र वसाहतींमध्ये विभागला गेला होता ( Partition of India ). या कायद्याला 18 जुलै 1947 रोजी ब्रिटन राजघराण्याची ( British royal family ) संमती मिळाली. त्यामुळे १५ ऑगस्टला भारत आणि १४ ऑगस्टला पाकिस्तान अस्तित्वात आला. आज भारत स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत आहे ( Azadi Ka Amrit Mahotsav ). त्यामुळे आज आपण या कायद्याविषयीच्या सर्व घटनांवर नजर टाकूयात
माउंटबॅटन योजना भारत राष्ट्रीय काँग्रेस, मुस्लिम लीग आणि शीख समुदायाच्या प्रतिनिधींनी या कायद्याला संमती दिल्यानंतर यूकेचे पंतप्रधान क्लेमेंट अॅटली आणि भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन यांनी एकत्रितपणे त्याचा मसुदा तयार केला होता. हा कायदा 3 जून योजना किंवा माउंटबॅटन योजना म्हणून ओळखला जाऊ लागला ( Mountbatten Plan ) .
कायद्याची पार्श्वभूमी युनायटेड किंग्डमचे तत्कालीन पंतप्रधान क्लेमेंट अॅटली यांनी २० फेब्रुवारी १९४७ रोजी ब्रिटिश सरकारकडून भारताला संपूर्ण स्वातंत्र्याचे अधिकार दिले जातील अशी घोषणा केली होती. अंतिम हस्तांतरणाची तारीख निश्चित होताच संस्थानांचे भविष्य निश्चित केले जाईल, असेही त्यांनी घोषित केले होते.या संदर्भात लॉर्ड माउंटबॅटन यांनी एक योजना तयार केली. जी माउंटबॅटन योजना म्हणून ओळखली जाते. योजनेत दोन तत्त्वे होती. भारत- पाकिस्तानची फाळणी होईल आणि दुसरी, त्यानंतर भारत चालवण्याचा ताबा भारतीयांच्या ताब्यात दिला जाईल.
या कायद्यांतर्गत केलेल्या महत्त्वाच्या तरतूदी 15 ऑगस्ट 1947 पासून भारत आणि पाकिस्तान या दोन नवीन आणि पूर्ण सार्वभौम वसाहतींमध्ये ब्रिटिश भारताचे विभाजन झाले. बंगाल आणि पंजाब या दोन नव्या देशांमधील प्रांतांचे विभाजन. दोन्ही देशांमध्ये गव्हर्नर जनरलची कार्यालये स्थापन केली जातील. हे गव्हर्नर जनरल क्राउनचे प्रतिनिधित्व करतील. कायदा बनवण्याचे संपूर्ण अधिकार दोन नवीन देशांच्या संविधान सभांना दिले जातील. 15 ऑगस्ट 1947 पासून संस्थानांवरची ब्रिटिशांची सत्ता संपुष्टात येणार होती. ब्रिटीश शासकाने "भारताचा सम्राट" ही पदवी सोडली. या कायद्यात दोन देशांमधील सशस्त्र दलांच्या विभाजनाचा समावेश आहे.
कायद्याची ठळक वैशिष्ट्ये भारतीय साम्राज्यातून दोन नवीन स्वतंत्र वसाहतींचा उदय या कायद्याच्या निर्मितीनंतर भारत ( India )आणि पाकिस्तान ( Pakistan ) या दोन नवीन स्वतंत्र वसाहती अस्तित्वात आल्या. भारताचे वर्चस्व स्वराज्यासाठी भारतातील सर्व लोकांच्या इच्छेचे प्रतिनिधित्व करेल, तर पाकिस्तानचे वर्चस्व स्वराज्यासाठी मुस्लिमांच्या मागणीचे प्रतिनिधित्व करेल.
पाकिस्तान पूर्व बंगाल, पश्चिम पंजाब, सिंध, वायव्य सरहद्द प्रांत, आसाममधील सिल्हेट विभाग, बहावलपूर, खैरपूर, बलुचिस्तानचा मुख्य आयुक्त प्रांत आणि इतर आठ संस्थान.
बंगाल बंगाल प्रांताचे अस्तित्व नाहीसे झाले. पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल हे दोन नवीन प्रांत अस्तित्वात आले.
पंजाब पश्चिम पंजाब आणि पूर्व पंजाब हे दोन नवीन प्रांत अस्तित्वात आले. या नवीन प्रांतांच्या सीमा सर सिरिल रॅडक्लिफ यांच्या अध्यक्षतेखालील समितीने निश्चित केल्या होत्या.
हेही वाचा Achievements In Sports क्रीडा क्षेत्रात भारत देशाची प्रतिमा उंचावलेल्या भारतीय महिला