ETV Bharat / bharat

Baisakhi 2023 : पंजाबमध्ये आज साजरा होतोय बैसाखीचा सण; जाणून घ्या, सणाचा इतिहास

पंजाबसह देशातील विविध राज्यांमध्ये आज बैसाखी सण साजरा केला जाणार आहे. पण हा बैसाखी सण का साजरा केला जातो? त्याचा इतिहास काय आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

पंजाबमध्ये आज साजरा होतोय बैसाखीचा सण
Baisakhi 2023
author img

By

Published : Apr 14, 2023, 7:28 AM IST

नवी दिल्ली - पंजाबमध्ये बैसाखी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. यावर्षी पंजाब, हरियाणासह उत्तर भारतातील काही भागात 14 एप्रिल म्हणजे आज बैसाखी उत्सव साजरा केला जात आहे. बैसाखी हा सण दरवर्षी विक्रम संवतच्या पहिल्या महिन्यात साजरा करण्यात येतो. शीख धर्मात बैसाखी सणाला ऐतिहासिक स्वरुपाचे महत्त्व आहे.

बैसाखीचे शीख धर्मात काय आहे महत्त्व:- शीख धर्माचे दहावे गुरु गोविंद सिंह जी यांनी 13 एप्रिल 1699 रोजी बैसाखीच्या दिवशी खालसा पंथाची सुरुवात केली होते. बैसाखीचा दिवस श्री आनंदपूर साहिब आणि श्री केसगढ साहिब येथे शीखांच्या सिंहासनावर विशेष मेळावादेखील म्हणून साजरा केला जातो. शीख धर्मात बैसाखीचा अत्यंत रंजक इतिहास आहे. शीख धर्मात, शीख नवीन वर्ष म्हणून बैसाखी साजरी केली जाते. या दिवशी शेतकऱ्यांची पिके तयार होऊन काढणीला येतात. सुगीच्या आनंदात हा सण शेतकरी साजरा करतात.

हिंदू धर्मात बैसाखीचे महत्त्व :- शीख धर्माबरोबरच हिंदू धर्मात बैसाखी सणाला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात बैसाखीच्या दिवशी पूजा आणि दान करण्याची प्रथा आहे. हिंदू मान्यतेनुसार, मुनी भगीरथ यांनी देवी गंगा पृथ्वीवर आणण्यासाठी तपश्चर्या केली. मुनी भगीरथाची तपश्चर्या बैसाखीच्या दिवशीच पूर्ण झाली. बैसाखीच्या दिवशी गंगेत स्नान आणि पूजा केल्याने विशेष फल प्राप्त होते हे हिंदू धर्मातही मान्य आहे.

बैसाखीच्या दिवशी शीखांचे विशेष उपक्रम:- बैसाखी सणानिमित्त शीख बांधव विविध पदार्थ घरी बनवतात. या व्यतिरिक्त, या दिवशी शीख भाविकांची गुरुद्वारांमध्ये जाऊन प्रार्थना करता. श्री गुरु गंथ साहिबसमोर नतमस्तक होतात. बैसाखीच्या दिवशी गुरुग्रंथ साहिब जीच्या पठण करत कीर्तन केले जाते. पंजाबमध्ये विविध ठिकाणी जत्रा भरतात आणि पंजाबी आनंदात भांगडा करतात.

बैसाखीची वेगवेगळी नावे:- बैसाखी हा सण पंजाब तसेच इतर राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. आसाममधील बिहू, केरळमधील पुरम विशू, बंगालमधील नबा वर्षाप्रमाणे, शीख लोक नवीन वर्ष म्हणून बैसाखी साजरे करतात. पंजाबमध्ये बैसाखी सण हा कृषी सण म्हणूनही साजरा केला जातो.

हेही वाचा-Owaisi On Asad Encounter : अतिक अहमदचा मुलगा असदच्या एन्काऊंटर ओवेसींकडून प्रश्न उपस्थित, म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.