डोडा (जम्मू आणि काश्मीर) : जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी शनिवारी दोडा जिल्ह्यातील थात्री भागातून लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्याची मालमत्ता जप्त केली. (Assets of Lashkar e Taiba commander seized). डोडाचे एसएसपी आणि जिल्हा दंडाधिकारी यांनी न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी एक टीम तयार केली होती. अतिरेक्याच्या खानपुरा गावात असलेली 04 कनाल आणि 2½ मरला जमीन महसूल आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने जप्त केली. (Doda Lashkar e Taiba commander).
पाकिस्तानात प्रशिक्षण घेतले : पोलिस प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, डोडाच्या थात्री भागात जप्त केलेली मालमत्ता पाकिस्तानातून कार्यरत असलेला लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अब्दुल रशीदची आहे. निवेदनात म्हटले आहे की अब्दुल रशीद 1993 मध्ये शस्त्रास्त्र प्रशिक्षण घेण्यासाठी पाकिस्तानात गेला होता आणि शस्त्रास्त्र प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याने भारतात घुसखोरी केली. तो डोडा जिल्ह्यात सक्रिय होता.
तरुणांना दहशतवादाकडे आकर्षित करतो : पोलिसांच्या निवेदनानुसार, अब्दुल रशीद इतर अतिरेक्यांसह नागरिक आणि सुरक्षा दलांवर हल्ले आणि परिसरात हिंसाचाराच्या घटनांमध्ये सामील असल्याचे आढळून आले आहे. याशिवाय त्याने नव्वदच्या दशकात परिसरातील अनेक तरुणांना दहशतवादात सामील होण्यासाठी प्रवृत्त केले व त्यांची भरती देखील केली होती. या दहशतवाद्याला न्यायालयानेही दोषी घोषित केले आहे. तो सध्या पाकिस्तानमधून काम करत आहे आणि सोशल मीडिया आणि व्हर्च्युअल पद्धतींचा वापर करून डोडा येथील तरुणांना दहशतवादात सामील होण्यासाठी आकर्षित करत आहे. (Lashkar e Taiba commander hiding in Pakistan).