दुबई: आशिया चषक 2022 ( Asia Cup 2022 ) स्पर्धेतील चौथा सामना आज दुबई इंटरनॅशल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना बलाढ्य भारत विरुद्ध हाँगकाँग ( IND vs HK ) संघात खेळला जाणार आहे. या सामन्याला रात्री साडसातला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी दोन्ही संघाच्या कर्णधारांमध्ये नाणेफेक पार पडली आहे. हाँगकाँग संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल -
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फक्त एक बदल करण्यात आला आहे. मागील सामन्यातील नायक हार्दिक पंड्याला ( All-rounder Hardik Pandya ) विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याजागी ऋषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी ( Rishabh Pant in the playing XI ) देण्यात आली आहे.
-
Toss Update: Hong Kong have won the toss and they have opted to bowl first against #TeamIndia https://t.co/9txNRez6hL… #INDvHK #AsiaCup2022 pic.twitter.com/VpFooHagSa
— BCCI (@BCCI) August 31, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Toss Update: Hong Kong have won the toss and they have opted to bowl first against #TeamIndia https://t.co/9txNRez6hL… #INDvHK #AsiaCup2022 pic.twitter.com/VpFooHagSa
— BCCI (@BCCI) August 31, 2022Toss Update: Hong Kong have won the toss and they have opted to bowl first against #TeamIndia https://t.co/9txNRez6hL… #INDvHK #AsiaCup2022 pic.twitter.com/VpFooHagSa
— BCCI (@BCCI) August 31, 2022
खेळपट्टीचा अहवाल ( IND vs HK Match Pitch Report ) -
बुधवारी ज्या खेळपट्टीवर सामना होणार आहे ती खेळपट्टी कठीण आणि उसळी घेणारी असेल. म्हणजे वेगवान गोलंदाजांसाठी ते चांगले होईल. दुबईत दव नसल्यामुळे दुसऱ्या डावात गोलंदाजी करणाऱ्या संघांच्या अडचणी कमी झाल्या आहेत. त्यानंतर अतिउष्णतेचा परिणाम खेळाडूंवर दिसून येत असून वेगवान गोलंदाजांना काहीसा त्रास होत आहे, त्यामुळे भारत पाकिस्तान सामन्यातील दोन्ही संघांना वेळेवर षटके पूर्ण करण्यास उशीर झाला. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान दोन्ही डावात ओव्हर रेट पेनल्टीची पद्धत लागू करावी लागली.
-
A look at #TeamIndia’s playing today. 📌
— BCCI (@BCCI) August 31, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
1 change as Hardik Pandya has been rested and Rishabh Pant replaces him. https://t.co/9txNRez6hL… #INDvHK #AsiaCup2022 pic.twitter.com/jLYqBBja3R
">A look at #TeamIndia’s playing today. 📌
— BCCI (@BCCI) August 31, 2022
1 change as Hardik Pandya has been rested and Rishabh Pant replaces him. https://t.co/9txNRez6hL… #INDvHK #AsiaCup2022 pic.twitter.com/jLYqBBja3RA look at #TeamIndia’s playing today. 📌
— BCCI (@BCCI) August 31, 2022
1 change as Hardik Pandya has been rested and Rishabh Pant replaces him. https://t.co/9txNRez6hL… #INDvHK #AsiaCup2022 pic.twitter.com/jLYqBBja3R
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युझवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंग.
हाँगकाँग (प्लेइंग इलेव्हन): निझाकत खान (कर्णधार), यासीम मोर्तझा, बाबर हयात, किंचित शाह, एजाज खान, स्कॉट मॅकेनी (विकेटकीपर), जीशान अली, हारून अर्शद, एहसान खान, आयुष शुक्ला आणि मोहम्मद गझनफर.
हेही वाचा - World Wrestling Championship : बजरंग, विनेश फोगट यांचा भारतीय कुस्ती संघात समावेश