ETV Bharat / bharat

जागतिक महिला दिन : आंध्र प्रदेशात सॅनिटरी नॅपकिन्सचे विनामूल्य वाटप, मुख्यमंत्र्यांचा निर्णय

author img

By

Published : Mar 6, 2021, 10:09 AM IST

आंध्र प्रदेशमधील 7 ते 12 वी वर्गातील विद्यार्थ्यींनींना सॅनिटरी नॅपकिन्सचे विनामूल्य वाटप करण्यात येणार आहे. प्रत्येक मुलीला एका महिन्यांला 10 सॅनिटरी नॅपकिन्स दिले जातील. याचबरोबर मुलींना स्पर्धात्मक परीक्षांसाठी सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण देण्याच्या सूचना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी दिल्या आहेत.

जागतिक महिला दिन
जागतिक महिला दिन

अमरावती - आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी जागतिक महिना दिनानिमित्त सोमवारी एक मोहीम लाँच करणार आहे. या अंतर्गत राज्यातील 7 ते 12 वी वर्गातील विद्यार्थ्यींनींना सॅनिटरी नॅपकिन्सचे विनामूल्य वाटप करण्यात येणार आहे. तसेच मुलींचे आरोग्य आणि स्वच्छतेवर भर देण्यासाठी राज्य सरकार एकूण 41.1 कोटी रुपये खर्च करणार आहे.

1 जुलैपासून सॅनिटरी नॅपकिन्सचे विनामूल्य वाटप शासकीय शाळा, गुरुकुल शाळा, महाविद्यालयात करण्यात येणार आहे. प्रत्येक मुलीला एका महिन्यांला 10 सॅनिटरी नॅपकिन्स दिले जातील. याचबरोबर मुलींना स्पर्धात्मक परीक्षांसाठी सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण देण्याच्या सूचना रेड्डी यांनी दिल्या आहेत.

महिलांच्या हक्कांचे रक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाला विशेष महत्त्व आहे. जगभरात ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस स्त्रीत्वाचा उत्सव म्हणून ओळखला जातो. प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत आहेत. आपल्या कर्तृत्त्वाने त्यांनी विविध क्षेत्रांत गगनभरारी घेतली आहे. महिलांच्या हक्कांचे रक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाला विशेष महत्त्व आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.