ETV Bharat / bharat

बिहार निवडणुकीतील पराभवानंतर आज काँग्रेसची महत्वाची बैठक - राहूल गांधी

बिहार निवडणूक निकालाच्या एका आठवड्यानंतर आज काँग्रेसची बैठक होणार आहे. काँग्रेसच्या अंतरीम अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल. सायंकाळी ५ वाजता व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे ही बैठक होणार आहे.

after-congress-debacle-in-bihar-and-by-polls-special-committee-to-meet-today
बिहार निवडणुकीत पराभवानंतर आज काँग्रेसची बैठक होणार
author img

By

Published : Nov 17, 2020, 7:55 AM IST

नवी दिल्ली - बिहार निवडणुकीत आणि इतर राज्यातील पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर आज काँग्रेसची बैठक होणार आहे. काँग्रेसच्या अंतरीम अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत आज ही बैठक होईल. सायंकाळी ५ वाजता व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे ही बैठक होणार आहे.

बैठक वादळी होण्याची शक्यता

निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर कॉंग्रेसमधील पुनरावलोकनाचा मुद्दा उपस्थित होत असताना ही बैठक होत आहे. काही महिन्यांपूर्वी सोनिया गांधी यांना पक्षात सुधारणा करण्याची मागणी करणारे पत्र काँग्रेसच्या 23 नेत्यांनी लिहिले होते. यामध्ये कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी या पराभवाचा नव्याने आढावा घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर कॉंग्रेसच्या सहकारी नेत्यांच्या रोषास त्यांना सामोरे जावे लागले होते. सिब्बल यांनी हा मुद्दा उचलल्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, दिल्ली काँग्रेस अध्यक्ष अनिल चौधरी यांनी सिब्बल यांच्यावर टीका केली होती.

बैठकीकडे सर्वांचे लक्ष

या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर, सोनिया गांधी यांच्या सल्लागार समितीची बैठक होत आहे. ऑगस्टमध्ये कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना संघटनात्मक आणि कार्यात्मक बाबींसाठी मदत करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन केली गेली.अहमद पटेल, के.सी. वेणुगोपाल, ए.के. अँटोनी, अंबिका सोनी, मुकुल वासनिक, रणदीप सुरजेवाला हे या समितीचे सदस्य आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, तब्येत बिघडल्यामुळे अहमद पटेल यांना रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे आत्ताची काँग्रेसची परिस्थिती बघता कॉंग्रेसमध्ये नवीन वादळ येणार की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बिहार आणि पोटनिवडणुकीतील पराभवावर चर्चा

नुकत्याच पार पडलेल्या बिहार निवडणुकीत महाआघाडीच्या पराभवासाठी कॉंग्रेसला दोष देण्यात येत आहे. महाआघाडीत राजद आणि डाव्या पक्षांचे यश मिळविण्याचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक होते. तर कॉंग्रेसने ७० जागा लढवून केवळ १९ जागा जिंकल्या. मध्यप्रदेशामधील पोटनिवडणूकीत काँग्रेसला २८ पैकी केवळ ९ जागा जिंकता आल्या. तर, कर्नाटकमधील दोन जागा आणि गुजरातमधील आठ जागांपैकी काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. तर, उत्तर प्रदेशमध्येही काँग्रेसची कामगिरी निराशाजनक राहिली.

मित्रपक्षाकडून टिका

राजदने बिहार निवडणुकीत काँग्रेसच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राजद नेते शिवानंद तिवारी यांनी पक्षाच्या नेतृत्त्वावर भाष्य केले की, प्रियांका गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासारख्या बड्या नेत्यांनी या निवडणुकीत भाग घेतला नाही. बिहारमध्ये राजद ७५ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला. तर, निवडणुकीत भाजपप्रणित रालोआने १२५ जागा जिंकल्या. त्यात भाजपने ७४, जद (यू) ने ४३, व्हीआयपीने ४ आणि एचएएमने ४ जागांवर विजय मिळवला. महागठबंधनने ११० जागा जिंकल्या, त्यात राजदने ७५, काँग्रेसने १९ आणि डाव्या पक्षाने १६ जागांवर विजय मिळवला. तर, एमआयएमने ५, बीएसपीने १, एलजेपीने १ आणि अपक्षने १ जागेवर विजय मिळवला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.