आंध्र प्रदेश - काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी आज बुधवार (19 ऑक्टोबर)रोजी आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातून दुसरा दिवस सुरू झाला आहे. राहुल गांधी यांनी मंगळवारी रात्री अदोनी मंडळाच्या चागी गावात उभारलेल्या शिबिराजवळ खास तयार केलेल्या बसमध्ये विश्रांती घेतली. त्यानंतर आज सकाळी बनवासी गावात यात्रेला सुरुवात केली. पदयात्रेपूर्वी राहुल गांधी यांनी अदोनी येथील श्री गंगा भवानी मंदिरालाही भेट दिली.
रात्रीच्या विश्रांती शिबिराभोवती विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दिवसभराची यात्रा पुर्ण करून गांधी अदोनी शहरातील कला महाविद्यालयात पोहोचतील आणि दुपारी ते माध्यमांशी संवाद साधतील. ही यात्रा 21 ऑक्टोबरपर्यंत चालणार असून राज्यातील 119 किमी अंतर कापणार आहे. कालपासून राज्यात सुरू झालेली गांधी यात्रा येथे चार दिवस चालणार आहे. त्यानंतर ही पदयात्रा पुन्हा कर्नाटकात दाखल होईल. दरम्यान, आंध्र प्रदेश काँग्रेस कमिटीने या यात्रेची सर्व व्यवस्था केली आहे. दरम्यान, तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे (TPCC) अध्यक्ष ए रेवंत रेड्डी यांनी 'राहुल यात्रा' यशस्वीपणे पार पाडण्यासाठी 14 समित्या स्थापन केल्या आहेत. जी राज्यात 23 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान सुमारे 350 किमीचे अंतर पार करेल.
राहुल यांनी आंध्र प्रदेशात पत्रकार परिषद घेतली. काँग्रस पक्षाच्या अध्यक्षपदी मल्लीकार्जुन खरगे यांची निवड झाली. त्यावर ते म्हणाले की, पक्षप्रमुख त्याबाबत सांगतील. ते म्हणाले, “काँग्रेस अध्यक्ष हा पक्षात सर्वोच्च असतो. प्रत्येक सदस्य अध्यक्षांकडे जातो. त्यामुळे पक्षातील माझी भूमिका आता खरगे ठरवतील अशी प्रतिक्रिया गांधी यांनी दिली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना राहुल यांनी भाजपसह अन्य राजकीय पक्षांवरही प्रश्न उपस्थित केले. 'काँग्रेसमधील निवडणुकांबाबत प्रत्येकजण प्रश्न विचारतो. काँग्रेसमध्ये खुल्या आणि पारदर्शक निवडणुका झाल्या याचा मला अभिमान आहे. भाजपसह अन्य प्रादेशिक पक्षांच्या निवडणुकीत कुणालाच का रस नाही असही ते म्हणाले आहेत.