बेंगळुरू: भाड्याच्या घरात वेश्या व्यवसाय चालवल्याच्या आरोपावरून सीसीबी पोलिसांनी 8 परदेशी नागरिकांना अटक केली आहे. (8 foreigners arrested). केंगेरी आणि सोलादेवनहल्ली येथे दोन वेगवेगळ्या छाप्यांमध्ये दोन महिला आणि सहा पुरुषांना अटक करण्यात आली. (prostitute racket in Bangalore).
बेकायदेशीर स्थलांतरित असल्याचा संशय : सीसीबीचे सहआयुक्त डॉ. एस.डी. शरणप्पा म्हणाले, "परप्रांतीयांकडून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सीसीबी पोलिसांनी केंगेरी आणि सोलादेवनहल्ली येथे छापा टाकला. यावेळी आठ जणांना अटक करण्यात आली. आरोपींनी मात्र चौकशीत आपण भारताचे रहिवासी असल्याचे सांगितले आहे. आरोपींकडे पश्चिम बंगाल आणि त्रिपुराचे आधार कार्ड, बांगलादेशचे कोविड लसीकरण प्रमाणपत्र आणि काही कागदपत्रे सापडली आहेत. आरोपी बेकायदेशीर स्थलांतरित असल्याचा संशय असून पुढील तपास सुरू आहे".