भोपाळ : मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यातील एका वृद्ध व्यक्तीच्या घरात आनंदाची बातमी आली आहे. या वयस्कर व्यक्तीची कमाल वाचून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. सतनामधील 62 वर्षीय वृद्ध व्यक्ती तीन मुलांचा बाप होऊन त्यांनी अनेकांना धक्का दिला आहे. उचेहरा तालुक्यातील अतर्वेदिया खुर्द गावातील रहिवाशी गोविंद कुशवाह यांचा विवाह एका 30 महिलेशी झाला होता. त्यानंतर ते आता 62 वर्षी तीन मुलांचे वडील झाले आहेत.
एकाच वेळी 3 मुलांचा जन्म : गोविंद कुशवाह यांच्या पत्नीचे नाव हिराबाई कुशवाहा आहे. हिराबाई कुशवाह यांनी मंगळवारी सकाळी तीन मुलांना जन्म दिला. या गोविंद कुशवाह यांच्या पत्नीला सोमवारी रात्रीपासून प्रसूतीच्या कळा येऊ लागल्या होत्या. त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना प्रसूतीच्या वार्डमध्ये दाखल केले. मंगळवारी सकाळी सीजरद्वारे हिराबाईने 3 मुलांना एकावेळी जन्म दिला.
वृद्ध वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद : तीन मुलांच्या जन्माची बातमी ऐकून वृद्धाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. पण तिन्ही मुलांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. तिन्ही मुलांवर उपचार सुरू आहेत.
"मी दोन विवाह केले आहेत, पहिल्या पत्नीचे नाव कस्तुरीबाई (वय 60 वर्षे) आहे. पहिल्या पत्नीपासून एक मुलगा होता, पण वयाच्या 18 व्या वर्षी त्याचा अपघाती मृत्यू झाला.'' - गोविंद कुशवाह.
मुलाचा मृत्यू झाल्यानंतर पहिली पत्नी कस्तुरीबाई ह्यांनी पती गोविंद यांना हिराबाईशी लग्न करण्यास सांगितले. त्यानंतर गोविंद यांनी दुसरा विवाह केला. त्यांना तब्बल 6 वर्षानंतर हिराबाईने मंगळवारी सकाळी 3 मुलांना जन्म दिला. तिन्ही मुले लवकरात लवकर बरी व्हावीत, यासाठी गोविंद देवाकडे प्रार्थना करत आहेत.
तिन्ही मुलांची प्रकृती चिंताजनक : जिल्हा रुग्णालयाचे प्रशासक डॉ. अमर सिंह यांनी सांगितले की, "रात्री उशिरा अतर्वेदिया गावातील हिराबाई कुशवाह यांना प्रसूतीच्या त्रासामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते." मंगळवारी सकाळी 6 वाजून 08 ते 10 मिनिटांच्या दरम्यान हिराबाईंनी एकत्र तीन मुलांना जन्म दिला. तिन्ही मुलांची प्रकृती चिंताजनक आहे. बाळांवर नवजात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. कारण महिलेने 34 आठवड्यात जन्म दिला आहे, तर नॉर्मल डिलिव्हरी 35 आठवड्यात पूर्ण झाली आहे, त्यामुळे बाळ कमकुवत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.