नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत ( Delhi Crime ) आणखी एक खळबळजनक खुनाची घटना समोर आली आहे. दक्षिण पश्चिम दिल्लीतील पालम पोलीस स्टेशन परिसरात एकाच कुटुंबातील ४ जणांची हत्या करण्यात ( 4 People Of Same Family Killed ) आली आहे. घरात उपस्थित असलेले आई, वडील, बहीण आणि आजीची हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. पालम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राज नगर पार्ट २ कॉलनीत ही हत्या झाली आहे. ( 4 People Of Same Family Killed In Palam Delhi )
चाकूने वार करून केली हत्या : प्राथमिक माहितीनुसार, एका मुलाने आई-वडील, बहीण आणि आजीची हत्या केली आहे. मंगळवारी रात्री 10.31 वाजता पोलिसांना ही माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, चौघांचीही चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे. आरोपी मुलगा अंमली पदार्थांच्या व्यसनाने त्रस्त असून नुकताच तो व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर पडला असल्याचेही सांगण्यात आले.
-
Delhi | Four members of a family including two sisters, their father and their grandmother were stabbed to death in a house in Palam area. The accused has been apprehended: Delhi Police
— ANI (@ANI) November 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Delhi | Four members of a family including two sisters, their father and their grandmother were stabbed to death in a house in Palam area. The accused has been apprehended: Delhi Police
— ANI (@ANI) November 23, 2022Delhi | Four members of a family including two sisters, their father and their grandmother were stabbed to death in a house in Palam area. The accused has been apprehended: Delhi Police
— ANI (@ANI) November 23, 2022
हत्येमागचे कारण अस्पष्ट : याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव केशव असल्याचे सांगण्यात येत आहे. हत्येमागचे कारण काय होते, याबाबत सध्या कोणताही खुलासा झालेला नाही. पोलिसांचे पथक आरोपीची सतत चौकशी करत आहे. त्याचवेळी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी आरोपींसोबत त्याच्या नातेवाईकांची आणि शेजाऱ्यांचीही चौकशी करण्यात येत आहे.
मृतांची नावे : ४२ वर्षीय दिनेश कुमार आरोपीचे वडील ,दिवाणो देवी आरोपीची आजी , आरोपीची आई दर्शन सैनी (४०) , उर्वशी आरोपीची बहीण (२२)