ETV Bharat / bharat

Alirajpur Bus Accident : खंडवा-बडोदा महामार्गावर बस नदीत कोसळून तीन ठार, तर 28 जण जखमी - खंडवा-बडोदा महामार्गावर भीषण बस अपघात

अलीराजपूरच्या खंडवा-बडोदा राज्य महामार्गावर ( Bus accident on Khandwa-Baroda highway ) बस नदीत कोसळून तीन प्रवासी ठार ( Three Passengers killed ) झाले, तर २८ जण जखमी झाले आहेत.

बस कोसळून तीन ठार
बस कोसळून तीन ठार
author img

By

Published : Jan 2, 2022, 8:58 PM IST

अलीराजपूर ( मध्यप्रदेश ) - अलीराजपूरमध्ये नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी मोठी दुर्घटना घडली. अलीराजपूरच्या खंडवा-बडोदा राज्य महामार्गावर ( Bus accident on Khandwa-Baroda highway ) बस नदीत कोसळून तीन प्रवासी ठार ( Three Passengers killed ) झाले, तर २८ जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह ( Chief Minister Shivraj Singh ) यांनी बस दुर्घटनेत मृत्यूमुखी पावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

या अपघातात जखमी झालेल्या 28 जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात 7 मुलेही जखमी झाली आहेत. यातील एका मुलाची प्रकृती गंभीर आहे. डॉक्टरांनी त्याला इंदौरला हलवण्यासाठी सांगितले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी पोहोचले आहे.

बस गुजरातमधील भुज येथून बरवानी येथे जात होती

अपघातग्रस्त बस खंडवा-बडोदा राज्य महामार्गावरील कल्व्हर्टचे रेलिंग तोडून १५ फूट खाली नदीत कोसळली. ही बस गुजरातमधील भुज येथून बरवानीच्या दिशेने जात होती. अपघात झाल्यापासून बस चालक फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. अलीराजपूरचे पोलीस अधीक्षक मनोज सिंह यांनी सांगितले, की चालक फरार आहे, मात्र त्याला लवकरच अटक करण्यात येईल. एक लोकल बस आहे ज्याचे फिटनेस प्रमाणपत्र आणि नोंदणी तपासली जात आहे. याशिवाय स्टेअरिंग बिघाडामुळे अपघाताची बाब समोर येत आहे.

हेही वाचा - Murder In Thane : डोक्यात दगड घालून 25 वर्षीय तरुणाची अंबरनाथमध्ये निर्घृण हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.