आज दिवसभरात/आजपासून -
- कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नांदेडमध्ये कॉंग्रेस नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीकडे सगळ्यांचेच लक्ष असणार आहे. शिवाय बैठकीनंतर नांदेडमध्ये इतरही पुरस्कार वितरणाचे कार्यक्रम नियोजित केले आहे.
- उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, बीड, परभणी, लातूर, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, अकोला, अमरावतीमध्ये काही भागांत पावसाची नोंद झाल्याचे उपग्रहीय चित्रांत दिसत आहे. पुढील काही तासांत या जिल्ह्यांत पावसाची शक्यता कायम आहे.
- टोकिओ पॅरालंपिक स्पर्धेला आजपासून सुरूवात होणार आहे. भारताकडून यंदाच्या स्पर्धेत 54 खेळाडू देशाचे प्रतिनिधीत्व करताना दिसणार आहेत. 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान रंगणाऱ्या स्पर्धेत भारताकडून आतापर्यंत सर्वाधिक खेळाडू भाग घेताना पाहायला मिळेल.
- म्हाडाच्या ८ हजार ९८४ घरांच्या नोंदणीला आजपासून ऑनलाइन सुरूवात होणार आहे.
- पुणे मेट्रोच्या कामासाठी छत्रपती संभाजी महाराज पूलादरम्यान (लकडी पूल) पिलरवर गर्डर टाकण्याचे काम सुरु होत आहे. त्यामुळे २४ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत सदरील पूल रात्री ११ ते स. ६ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद असणार आहे.
- आज मुंबई मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रांवर कोव्हिशिल्डचे 18 व 45 वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू राहिल तर कोव्हॅक्सिनचे 18 व 45 वर्षावरील नागरिकांसाठी नमूद केंद्रांवर लसीकरण सुरू राहिल.
- बैलगाडा शर्यतीबाबत आज महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.
कालच्या महत्वाच्या बातम्या -
नवी दिल्ली - अफगाणिस्तानात अनेक भारतीय नागरिक अडकले आहेत. आज सकाळी दोहा येथून 146 जणांना घेऊन भारतीय हवाई दलाचे विमान मायदेशी परतले. तर आतापर्यंत भारतीय हवाई दलाने काबूलमधून जवळपास 400 नागरिकांना भारतात आणलं आहे. यात 329 जण भारतीय नागरिक आहेत. तर इतर अफगाणिस्तानातील शिख आणि हिंदू नागरिक आहेत. वाचा सविस्तर...
अहमदनगर - पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील वरिष्ठांकडून होत असलेल्या त्रासामुळे आत्महत्या करणार असल्याचा इशारा देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यासंदर्भात त्यांनी खुलासा करत, ती ऑडिओ क्लिप आपलीच असून तरी ती मी व्हायरल केली नव्हती, असे म्हटले आहे. तसेच एका महिला अधिकारी आपले गार्हाणे मांडताना किती हतबल झाली आणि ती आत्महत्येच्या विचारांवर आली, हे ऐकून संबंधितांना पाझर फुटला नाही, उलट क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्रास कमी होण्याऐवजी वाढला असल्याची खंत तहसीलदार ज्योती देवरे यांनी आज सोमवारी प्रसारमध्यमांसमोर व्यक्त केली. सविस्तर वाचा...
मुंबई - देशात जातीनिहाय जनगणना व्हावी ही मागणी वाढत आहे. यासंबंधी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. लवकरच याबाबत निर्णय घेऊ असे आश्वासन मोदींनी नितीश कुमार यांना दिले आहे. मात्र, केंद्रामध्ये भाजपची सत्ता असेपर्यंत जातीनिहाय जनगणना होऊ शकत नाही, असं मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. सविस्तर वाचा...
जालना - तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा इशारा नीती आयोगाने केंद्राला दिला आहे. अशा बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत. नीती आयोगाने असा कोणताही इशारा राज्याला दिलेला नाही, असं स्पष्टीकरण राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात दिले आहे. वाचा सविस्तर...
पणजी - मागच्या आठवड्यात उत्तर गोव्यातील शिवोली येथे आत्महत्या केलेल्या दोन रशियन तरुणीपैकी अलेक्झांड्रा या तरुणीच्या मृत्यूचे गूढ उकलेले आहे. चेन्नईतील एक छायाचित्रकाराच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी चेन्नई पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली होती. या रशियन तरुणीने तामिळ चित्रपट सृष्टीत काम केले होते. कांचना ३ चित्रपटात ती मुख्य भूमिकेत होती. तसेच ती मॉडेलिंग क्षेत्रांतही काम करत होती. वाचा सविस्तर...
नांदेड - काही पर्यावरणवाद्यांनी आक्षेप घेतला आहे. त्याबाबत सरकार आपली बाजू हायकोर्टात मांडेल. परंतु, अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्यामुळे शिवस्मारकाचे काम बंद आहे, अशी माहिती माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. चव्हाण आज नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. वाचा सविस्तर...
गडचिरोली - महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२१ चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. ५ सप्टेंबर २०२१ रोजी शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरित होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील आसरअली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक खुर्शिद शेख यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. वाचा सविस्तर...
जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -