नवी दिल्ली - दिल्लीत ध्वस्त होत असलेल्या आरोग्य व्यवस्थेचे चित्र समोर येत आहे. येथील जयपूर गोल्डन रुग्णालयात ऑक्सिजन अभावी एकसाथ २१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीच्या रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. उच्च न्यायालयाने दिल्लीतील आरोग्य व्यवस्थेवर चिंता व्यक्त करताना म्हटले आहे, की ही कोरोनाची लाट नसून सुनामी आहे. सरकारने उच्च न्यायालयात २१ मृत्यूंची माहिती दिली आहे.
200 रुग्णांच्या जीवाला धोका -
रुग्णालय प्रशासनाने सांगितले, की सध्या रुग्णालयात 200 कोविड रुग्ण दाखल आहेत. त्यांच्या जीवाला धोका आहे. कारण रुग्णालयात केवळ अर्ध्या तासांचा ऑक्सिजन शिल्लक राहिला आहे. रुग्णालयाकडून डॉ. डीके बलूजा यांनी सांगितले, की ऑक्सिजनच्या अभावी शुक्रवारी रात्री 21 रुग्णांचा मृत्यू झाला. अजूनही 200 हून अधिक कोविड रुग्ण दाखल आहेत. रुग्णालयात केवळ ३० मिनिटे पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक आहे.