श्रीनगर- जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा नायनाट करण्याची मोहिम सुरुच आहे. दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये अनंतनाग जिल्ह्यात चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत.
सैन्यदलाने पोलिसांसमवेत अनंतनाग जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांविरोधात मोहिम सुरू केली आहे. सैन्यदलाला दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सैन्यदलाचे १९ आरआर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने कॉर्डन आणि सर्च ऑपरेशन सुरू केले. दोन्ही टीमचे दल हे संशयास्पद ठिकाणी पोहोचले. यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलाने गोळीबार केल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. यावेळी चकमकीत तीन अज्ञात दहशतवादी ठार झाल्याचेही पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. सुरक्षा दलाची अजूनही मोहिम सुरू आहे.
-
All three local terrorists of LeT outfit killed in Anantnag encounter: IGP Kashmir Vijay Kumar
— ANI (@ANI) July 10, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
(file photo) pic.twitter.com/d5PRepDjgw
">All three local terrorists of LeT outfit killed in Anantnag encounter: IGP Kashmir Vijay Kumar
— ANI (@ANI) July 10, 2021
(file photo) pic.twitter.com/d5PRepDjgwAll three local terrorists of LeT outfit killed in Anantnag encounter: IGP Kashmir Vijay Kumar
— ANI (@ANI) July 10, 2021
(file photo) pic.twitter.com/d5PRepDjgw
हेही वाचा-कडकनाथचे चिकन खाल्ल्याने वाढते प्रतिकारक्षमता, मध्य प्रदेशमधील संशोधन संस्थेचा दावा
९ जुलैला जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी येथील भारत-पाकिस्तानच्या सीमेवरील दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रयत्न सैन्यदलाने उधळून लावले होते. त्यावेळी दोन पाकिस्तानी दहशतवादी ठार झाले. तर दोन जवानांना वीरमरण आले.
हेही वाचा-VIDEO खांद्यावर हात ठेवताच काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनी कार्यकर्त्याला मारली थप्पड
गुरुवारी ४ दहशतवाद्यांना कंठस्नान -
जम्मूत दोन ठिकाणी झालेल्या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाला ४ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. या चकमकी गुरुवारी कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यात झाल्या. पहिली चकमक कुलगाम जिल्ह्यातील झोदार भागात तर दुसरी चकमक पुलवामा जिल्ह्यातील पुचल येथे झाली.