ETV Bharat / bharat

Minor Boy Murder In MP : अनैसर्गिक संबंधासाठी मित्राचा तीन अल्पवयीन मित्राकडून गळा आवळून खून - मुलाचा गळा आवळून खून

अनैसर्गिक संबंधासाठी तीन अल्पवयीन मुलांनी त्यांच्या अल्पवयीन मित्राचा खून केला आहे. या घटनेने मध्य प्रदेशात मोठी खळबळ उडाली आहे. या तीन मुलांनी अतिशय थंड डोक्याने या मुलाचा खून केला असून या मारेकऱ्यांना अटक केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Minor Boy Murder In MP
कापडी पिशवीत फेकलेले मुलाचा मृतदेह
author img

By

Published : May 16, 2023, 2:09 PM IST

Updated : May 16, 2023, 2:21 PM IST

भोपाळ : अनैसर्गिक शारीरिक संबंधासाठी तीन मुलांनी अल्पवयीन मुलाचा थंड डोक्याने खून केल्याने खळबळ उडाली. या अल्पवयीन मुलांनी दगड, सायकलची चेन आणि बोकड कापायच्या चाकूने अल्पवयीन मित्राचा खून केला. ही घटना मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील मगरकाथा येथे सोमवारी उघडकीस आली आहे. या अल्पवयीन मुलांनी मृतदेह कापडी पिशवीत भरुन ढिगाऱ्यावर फेकल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. या मुलांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 14 दिवस बाल सुधारगृहात रवानगी करण्याची शिक्षा ठोठावली आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

कशी आली घटना उघडकीस : मध्य प्रदेशातील मगरकाथा गावातील 3 मित्र सोबत राहत होते. यावेळी या तिघांनी एका 12 वर्षाच्या मित्राचा अनैसर्गिक शारीरिक संबंधासाठी निर्घृणपणे खून केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या मुलांनी खून केल्यानंतर तो कोणालाही कळू नये म्हणून एका कापडी पिशवीत भरला होता. त्यानंतर तो गावातील मातीच्या ढिगाऱ्यावर फेकून दिला. मात्र गावातील एका महिलेने रक्ताने माखलेली पिशवी पाहिली. त्यामुळे त्या महिलेने याबाबतची माहिती गावकऱ्यांना दिली. त्यामुळे खुनाची ही घटना उघडकीस आली आहे.

कशी घडली घटना : मगरकाथा गावातील या तीन मुलांनी 12 वर्षाच्या मुलाला निर्जनस्थळी बोलावले होते. यावेळी या मुलांनी सायकलच्या चेनने त्या मुलाचा गळा आवळून त्याच्या डोक्यात दगड घातले. त्यानंतर बोकड कापायच्या चाकूने त्याचा गळा चिरला. अत्यंत थंड डोक्याने या तीन मुलांनी खून केला आहे. त्यामुळे या मुलांनी तो मृतदेह पिशवीत भरुन एका महिलेच्या घराजवळ टाकून या मुलांनी पळ काढला. त्यामुळे शेजारील महिलेने याबाबतची माहिती गावकऱ्यांना दिल्याने ही खुनाची घटना उघडकीस आली. याप्रकरणातील तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने या मारेकऱ्यांना न्यायालयाने 14 दिवस बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती बरघाट पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रसन्न शर्मा यांनी दिली.

थंड डोक्याने केला खून : या मारेकऱ्यांनी अत्यंत थंड डोक्याने खून केला आहे. सराईत मारेकऱ्यांप्रमाणे या मुलांनी मुलांनी त्यांच्या अल्पवयीन मित्राचा खून केला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची पुढील तपास सुरू असल्याची माहिती बरघाट पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रसन्न शर्मा यांनी दिली

सोशल माध्यमांमुळे होतात घटना : सोशल मीडिया आणि टीव्हीवर येणारे कार्यक्रम अशा घटनांमागे जबाबदार असतात. त्यामुळे पालकांनी मुलांकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांची मुले टीव्ही मोबाइलवर किंवा कोणत्या पद्धतीचा कंटेंट पाहत आहेत. यासह कोणता ट्रेंड पाहण्याकडे मुलांचा कल आहे, याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत पोलीस अधीक्षक राम जी श्रीवास्तव यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा -

  1. CBI Summons Sameer Wankhede : समीर वानखेडेंना सीबीआयचे चौकशीसाठी समन्स; म्हणाले, शेवटच्या श्वासापर्यंत...
  2. Amravati Crime News: सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणे भोवले, भाजपच्या माजी नगरसेवकांसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
  3. Woman Intruder : पाकच्या संशयित महिलेचा घुसखोरीचा प्रयत्न जवानांनी पाडला हाणून, गोळीबारात महिला ठार

Last Updated : May 16, 2023, 2:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.