ETV Bharat / bharat

Paryushan Parv 2022 पर्युषण पर्वात आचरणात आणले जाणारे 10 मोठे नियम - जैन धर्म

जैन समाजाचा Jainism सर्वात पवित्र उत्सव म्हणजेच पर्युषण पर्व Paryushan Parv 2022 बुधवार दिनांक 24 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. जैन धर्माच्या पर्युषण पर्वाला सणांचा राजा म्हणतात. जैन धर्मीयांसाठी या सणाचे खूप महत्त्व आहे. तसेच या पर्वा दरम्यान 10 मोठ्या धर्मांचे म्हणजेच नियमांचे 10 Great Rules पालन उपासकांकडून Practiced During Paryushan Parv केले जाते. काय आहे ते दहा नियम जाणुन घेऊया.

Paryushan Parv 2022
पर्युषण पर्वातील 10 मोठे नियम
author img

By

Published : Aug 20, 2022, 2:12 PM IST

Updated : Aug 24, 2022, 11:55 AM IST

जैन समाजाचा Jainism सर्वात पवित्र उत्सव म्हणजेच पर्युषण पर्व Paryushan Parv 2022 बुधवार दिनांक 24 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. जैन धर्माच्या पर्युषण पर्वाला सणांचा राजा म्हणतात. जैन धर्मीयांसाठी या सणाचे खूप महत्त्व आहे. तसेच या पर्वा दरम्यान 10 मोठ्या धर्मांचे म्हणजेच नियमांचे 10 Great Rules पालन उपासकांकडून Practiced During Paryushan Parv केले जाते. काय आहे ते दहा नियम व त्यांचे मानवी जिवनातील महत्व जाणुन घेऊया.

क्षमा धर्म आचारापेक्षा गुणात्मक असलेला जैनधर्म हा १० प्रकारांत सामावला आहे. क्षमा हा आत्म्याचा मुख्य गुण आहे. पण क्रोधामुळे हा क्षमागुण दाबल्या जातो. असे म्हणतात की, षड्‌‌रिपूतील शक्तीमान क्रोधाला ही जिंकू शकते, ती क्षमा. क्रोध अपयशाकडे ओढून नेतो, तर क्षमा ही यशाकडे वाटचाल करणारी आहे. नदी जशी सर्व घाण स्वीकारते, पण सदैव स्वच्छ राहाते. ती स्वच्छ राहून इतरांना पाणी देऊन तृप्त करते. तसेच आपल्या जीवनात क्षमा या शब्दाला महत्व आहे. क्षमा हे आपले जगण्याचे कवच आहे. म्हणुन पर्युषण पर्वाच्या या दिवसांमध्ये या धर्माचे पालन केल्या जाते.

मार्दव धर्म अहंकार हा माणसाचा मोठा शत्रू आहे. अहंकार माणसाला हीन व कृतीशील करतो. ही कटुता त्याग करणे म्हणजेच मार्दव ,मृदुता होय. नम्रता आणि विनय हे गुण आत्मसात करणे म्हणजे ईश्वराशी जवळीक साधणे होय. आयुष्यात यश प्राप्त करण्यासाठी मुदृता-मार्दवच धारण केले पाहिजे.

आर्जव धर्म आर्जव म्हणजे ऋजुता, सरलता, मनात जे असेल तेच वचनात आणणे, तशीच कृती करणे होय. आत्माच्या हिताचा विचार करणाऱ्यांनी आर्जव धर्माचा आश्रय घेतला पाहिजे. आर्जव धर्म मोक्षाकडे नेणारा आहे. ज्याचे मन सरळ असेल, त्याच्या जवळ फारसे धन नसले, तरी तो सुखासमाधानाने जगतो.

उत्तम शौच धर्म शौच म्हणजे शुध्दता, पावित्र्य, मांगल्य होय. मलिन शरीराला आपण स्नान करून स्वच्छ करतो. चांगल्या कपड्यांनी नटवतो. मात्र मनाला निर्मल ठेवणे हेही तितकेच महत्त्वाचे असते, हे आपण विसरतो. मन स्वच्छ असल्याशिवाय शारीरिक शुद्धतेला काही अर्थ नाही. मन पवित्र, तर शरीरही पवित्र असे म्हणतात.

सत्य धर्म सर्वच धर्मांत सत्याला महत्त्वाचे स्थान आहे. सत्य वचनाने मनुष्याचे जीवन उज्ज्वल होते. सत्य अतिशय दुर्लभ आहे, पण ते एकदा प्राप्त झाले की मनुष्य त्याशिवाय राहू शकत नाही. असत्य बोलणाऱ्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. असत्य फार काळ टिकत नाही. जो प्राणी सत्याचा आश्रय घेतो, त्याला जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात अडकावे लागत नाही.

उत्तम संयम धर्म पंचेंद्रियांवर संयम मिळविणे अतिकठीण आहे, पण अशक्य नाही. विद्यार्जन, अर्थार्जन, घरसंसार या सर्वांच्याच बाबतीत संयम आवश्यक आहे. एवढेच नाही, तर वाणीवरही संयमाची गरज आहे. योग्य वेळी ब्रेक लावला नाही, तर अपघात घडतो. त्याचप्रमाणे मानवी जीवनाच्या या गाडीला इंद्रियांच्या, मनाच्या आणि वासनांच्या संयमाच्या ब्रेकची गरज आहे. आपल्या गरजा सीमित करणे, मर्यादित ठेवणे, कोठे थांबायचे हे कळणे म्हणजे संयम होय.

त्याग धर्म त्याग ही भारतीय संस्कृतीची मोठी देणगी आहे. तृष्णेपासून मुक्ती म्हणजे त्याग. त्याग हा प्रकाशाकडे नेणारा मार्ग आहे. तर तृष्णा अंधःकाराकडे नेणारी आहे. भारतीय संस्कृती ही त्यागमय आहे. स्वार्थीपणाचा त्याग करा. दान करा, असा संदेश आपली संस्कृती देते. आपले जे आहे, त्यात इतरांना सहभागी करून घ्या, असे ती सांगते.

आकिंचन्य धर्म ज्ञान दर्शनमय स्वरूपापेक्षा दुसरे काहीही माझे नाही, ही भावना म्हणजे आकिंचन्य धर्म होय. आत्मा शरीरापेक्षा भिन्न आहे. तो ज्ञानानंदाने परिपूर्ण आहे. हे शरीर म्हणजे मी नाही. मी केवळ या सर्वांचा ज्ञाता आहे. शरीर ही मला मिळालेली देणगी आहे. त्यामुळे कर्तव्य करा, पण त्यात अडकू नका असे आकिंचन्य धर्म सांगतो.

ब्रह्मचर्य धर्म सर्व विषय़ांचा मोह सोडून आत्म्यात लीन होणे म्हणजे ब्रह्मचर्य होय. ब्रह्मचर्य धारण करण्याची क्षमता असलेला मनुष्य सहजच इंद्रियांवर आणि वासनेवर विजय मिळवू शकतो. सर्व १० धर्मांत श्रेष्ठ असा ब्रह्मचर्य धर्म आहे. स्त्री सुखाचा वा पुरुष सुखाचा आस्वाद घेण्यासाठी एक सामाजिक व्यवस्था म्हणजे विवाह. त्या विवाहातील मांगल्य, पावित्र्य जपून एक नवी पिढी आपण घरात आणतो. वैवाहिक संबंध उत्तम राहावेत, अनुरागी राहावेत आणि परस्परांच्या आत्मविकासासाठी उपयोगी पडावेत, यासाठी ब्रह्मचर्याची साधना आवश्यक आहे. तुच्छ आणि हीन कामवासनेला बळी पडून, आपला गौरव, आपली अस्मिता आणि लौकिक, साधना नष्ट करण्यासारखे महापाप नाही. उत्तम ब्रह्मचर्य हे जीवननौकेचा सुकाणू होय.

हेही वाचा Paryushan Parva 2022 जैन धर्मात काय आहे पर्युषण पर्वाचे महत्व, पार्वधिराज म्हणजे काय

Last Updated : Aug 24, 2022, 11:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.