हैदराबादNational Pollution Control Day : दरवर्षी 2 डिसेंबर रोजी 'राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस' साजरा केला जातो. हा दिवस 1984 मध्ये भोपाळ गॅस दुर्घटनेत प्राण गमावलेल्या नागरिकांच्या स्मृतीस समर्पित आहे. भोपाळ गॅस दुर्घटना ही जगातील सर्वात भयानक औद्योगिक अपघातांपैकी एक होती. या दुर्घटनेत हजारो नागरिकांना आपले प्राण गमावावे लागले होते. तसंच यामुळं लाखो लोक प्रभावित झाले होते. या दिवसाचा उद्देश केवळ त्या घटनेचे स्मरण करणं नसून प्रदूषणाच्या दुष्परिणामांबद्दल जनजागृती करणं, प्रदूषणावर उपाययोजन करणं आहे.
भोपाळ गॅस दुर्घटना : 2 आणि 3 डिसेंबर 1984 च्या रात्री मध्य प्रदेशातील भोपाळ शहरातील युनियन कार्बाइड कारखान्यातून मिथाइल आयसोसायनेट (MIC) वायूची गळती झाली होती. या विषारी वायूनं हजारो लोकांचा बळी घेतला होता. तसंच अनेकांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अपंग बनवलं होतं. या शोकांतिकेनं केवळ भारतातंच नव्हे, तर संपूर्ण जगाला औद्योगिक सुरक्षा आणि प्रदूषण नियंत्रणाचं महत्त्व पटवून दिलंय.
'राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवसा'चं महत्त्व : हा दिवस आपल्याला पर्यावरणीय प्रदूषणामुळं होणाऱ्या धोक्यांकडं लक्ष वेधून घेतो. तसंच त्यावर उपाय शोधण्यासाठी प्रेरित करतो. झपाट्यानं वाढलेलं शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि लोकसंख्या वाढ यामुळं प्रदूषण ही अधिक गंभीर समस्या बनली आहे. वायू, पाणी तसंच ध्वनी प्रदूषणामुळं आपलं निसर्गाचा समतोल बिघडत आहे.
प्रदूषणाबद्दल जागरूकता वाढवणे : लोकांना प्रदूषणाचं दुष्परिणाम समजावून सांगणे. तसंच प्रदूषण कमी करण्यासाठी त्यांना शिक्षित करणे.
औद्योगिक सुरक्षिततेवर लक्ष :उद्योगांमध्ये सुरक्षा मजबूत करावी. तसंच धोकादायक वायूंच्या गळतीसारख्या घटना रोखण्यासाठी अधिक उपयांची गरज आहे.