मुंबई - Vasai Crime News :वसई पूर्व चिंचपाडा परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकरानं प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केली. भररस्त्यात प्रियकरानं प्रेयसीला रस्त्यावर पाडून लोखंडी पाना डोक्यात घालून निर्घृणपणे हत्या केल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संशयीत आरोपी प्रियकर रोहित यादव याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरती यादव (वय 20) असं हत्या केलेल्या तरूणीचं नाव आहे. दरम्यान या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत आरतीचा आरोपी रोहित यादवचा प्रियकर होता. हे दोघे दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. काही दिवसांपूर्वी या दोघांचं ब्रेकअप झालं होतं.
प्रेयसीची डोक्यात लोखंडी पाना घालून प्रियकरानं केली हत्या : यानंतर आरती ही आरोपी रोहितबरोबर बोलत नव्हती. या गोष्टीचा राग आरोपी रोहितला आला होता. याशिवाय रोहितनं अनेकदा आरतीची मनधरणी केली. मात्र ती त्याच्याबरोबर बोलायला तयार नव्हती. यावरून रोहितला राग अनावर झाला, यानंतर आज 18 जून रोजी पहाटे त्यानं आरतीचा पाठलाग केला आणि भररस्त्यात तिच्यावर लोखंडी पाना मारला. जेव्हा आरोपी रोहित हा आरतीवर वार करीत होता, तेव्हा रस्त्यावरील उभे असलेले लोक फक्त पाहत होते. काहीजण मोबाइलमध्ये व्हिडीओ शूट करत होते. यावेळी कुणीही आरतीच्या मदतीला समोर आलं नाही. रोहित हा आरतीच्या डोक्यात तसेच छातीत लोखंडी पाना सतत मारत राहिला.
प्रेयसीचा झाला जागीचा मृत्यू :या घटनेत आरतीला गंभीर जखमी झाली. अतिरक्तस्त्राव झाल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला. आरतीच्या मृत्यूनंतर रोहित तिच्या मृतदेहाजवळ बसून जोरजोरात रडत होता. या घटनानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी आरतीचा मृतदेह ताब्यात घेतलं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी रोहित याला अटक केली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आता पोलीस चौकशी करत आहे. याशिवाय आरतीच्या पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर याप्रकरणी आणखी काही माहिती समोर येईल. आता या घटनेमुळे परिसरात एक भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
वसई घटनेसंदर्भात कठोर कारवाई करण्याचे निर्देश : देवेंद्र फडणवीस वसईत एका तरुणीची भररस्त्यात हत्या झाल्याची घटना अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे. मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तांना या घटनेसंदर्भात कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोपीला अटक करण्यात आली असून, सखोल तपास करुन, न्यायालयातसुद्धा भक्कम पुराव्यानिशी बाजू मांडून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईल, यादृष्टीने निर्देशित करण्यात आले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
हेही वाचा :
- मुंबईत 20 जून पासून मान्सून सक्रिय होणार... पालघर, ठाणे, मुंबईसाठी 'ग्रीन' तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला 'ऑरेंज अलर्ट' - Monsoon in Mumbai
- मुंबई पोलिसांच्या हाती तुरी देत तीन कुख्यात आरोपी रेल्वेतून उड्या टाकत फरार; उत्तर प्रदेशातून आणत होते मुंबईत - Accused Escaped Jumping from Train
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पंतप्रधान मोदी आज काशीतून किसान सन्मान योजनेचा 17 वा हप्ता करणार जारी - PM Modi Varanasi visit