महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्राती 'या' गावात होतात प्रेमविवाह, महिला सरपंचासह 11 ग्रामपंचायत सदस्यामध्ये फुलले प्रेमाचे गुलाब

Valentine's Day : चंद्रपूरमध्ये एक असं एक गाव आहे, जे प्रेमविवाहासाठी ओळखलं जातं. गोंडपिपरी तालुक्यातील करंजी गावात गेल्या चार दशकात 200 हून अधिक प्रेमविवाह झाले आहेत. विधानसभेती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारदेखील याच गावचे रहिवासी आहेत. त्यांनीही प्रेमविवाह केल्याचं गावकरी सांगतात. एवढंच नाही तर सरपंच, उपसरपंच अशा 11 सदस्यीय ग्रामपंचायतीतील सहा सदस्यांनी प्रेमविवाह केला आहे.

Valentine's Day
Valentine's Day

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 14, 2024, 11:02 PM IST

चंद्रपूर Valentine's Day : प्रेमविवाहांना आजही समाजमान्यता लवकर मिळत नाही. त्यामुळं प्रेमीयुगलाच्या ऑनर किलिंगच्या अनेक अजूनही घडताना दिसत आहेत. 'करंजी' हे गाव चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यात आहे. या गावात गेल्या 40 वर्षात तब्बल 200 हून अधिक प्रेमविवाह झाले आहेत. पूर्वी हे गाव गुन्हेगारीसाठी ओळखले जात होतं. विशेष म्हणजे या गावातील महिला सरपंचाचा प्रेमविवाह आहे. तसंच 11 ग्रामपंचायत सदस्यांनी 6 ग्रामपंचायत सदस्यांसोबत प्रेमविवाह केला आहे.

200 हून अधिक जोडप्यांचे प्रेमविवाह : घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केल्यानं साहजिकच कौटुंबिक आव्हानं येतात. अशी बरीच आव्हानं प्रेमविवाह करणाऱ्या कुटूंबाच्याही वाट्याला आली. मात्र, त्यांनी प्रेमाचा सामाजिक संदेश दे प्रेमविवाहच्या प्रश्नातून मार्ग काढला आहे. त्यामुळं कोण्त्याही समाजात, गटात, कुटुंबात तणावाची स्थिती निर्माण झाली नाही. यामुळं गावात कायम शांतता, सुव्यवस्थेसह आनंदाचं वातावरण आहे. उलट वाद होतं असतील, तर सामंजस्यानं सोडविण्यासाठी गावाचे सामूहिक प्रयत्न असतात. हे चित्र कुठल्याही गावातील चित्रापेक्षा वेगळं आहे. त्यामुळं एकीकडं प्रेमविवाहांना सामाजिक मान्यता मिळत नाही, तर दुसरीकडं प्रेमविवाह करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. हे गाव चंद्रपूरपासून 50 किमी अंतरावर आहे. गेल्या 4 दशकात या गावात 200 हून अधिक जोडप्यांनी प्रेमविवाह केला आहे. यातील बहुतांश विवाह आंतरजातीय आहेत. त्यामुळं गावात जाती-पातीच्या पलीकडं जाऊन सलोखा निर्माण झाला आहे.

गाव प्रेमातून समृद्धीकडं : या गावात पूर्वी खूप मारामारी व्हायची. हे गाव पूर्वी गुन्हेगारी प्रवृत्तीसाठी प्रसिद्ध होतं. पण हळूहळू या गावानं प्रेमाची वाट धरली. आता गावातील अनेक वाद तंटामुक्त समितीच्या माध्यमातून मिटवले जातात. प्रेम असल्यास दोघांच्याही घरच्यांना समजावून सांगितलं जातं. दोघांच्या संमतीनंतर गावच्या मंदिरात किंवा ग्रामपंचायतीत लग्न केलं जातं. त्यामुळं दोघांच्याही कुटूंबाला हातभार लागतो. तसंच जाती-पाती नष्ट होण्यास मदत होते.

प्रेमविवाहाचे 27 वर्षे :गावातील एकानं सांगितलं की, शिकत असताना मी शेजारी राहणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडलो. त्यानंतर आम्ही 1997 मध्ये प्रेमविवाह केला. लग्नापूर्वी आम्ही चार वर्षे प्रेमात होते. आज माझ्या लग्नाला 27 वर्षे झाली आहेत. मला दोन मुलं असून आम्ही सुखी जीवन जगत आहेत. तसंच गावातील ग्रामपंचायत सदस्य सांगतात माझा आंतरजातीय प्रेमविवाह झाला आहे. 2011 पासून आम्ही सुखानं संसार करत आहोत.

हे वाचलंत का :

  1. प्रेमावरील विश्वास बळकट करणारी बॉलिवूड कपल्स
  2. ताजमहालसमोर प्रिन्स कार्तिक आर्यन क्रिती सेनॉनसोबत झाला रोमँटिक
  3. आरोग्याचा संदेश देत नाशिकच्या जोडप्यांनी साजरा केला व्हॅलेंटाईन डे

ABOUT THE AUTHOR

...view details