महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शपथ घेतल्यानंतर नवनिर्वाचित आमदारनं स्वतःच्या हातानं केला स्वयंपाक; कार्यकर्त्यांसाठी खमंग मेजवानी

शिवसेनेच्या संजय रायमुलकर यांना विधानसभा निवडणुकीत चारी मुंड्या चित करणारे मेहकरचे नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ खरात यांच्या एका कृतीनं संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं आहे.

SIDDHARTH KHARATB COOKED FOOD
आमदार सिद्धार्थ खरात जेवण करताना (Source - ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : 10 hours ago

Updated : 9 hours ago

बुलढाणा : मेहकर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय रायमुलकर यांचा पराभव करत शिवसेनेच्या (उबाठा) सिद्धार्थ खरात यांनी दमदार विजय मिळवला. नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ खरात यांचा शपथ ग्रहण सोहळा नुकताच पार पडला. परंतु विशेष बाब अशी की, या शपथ ग्रहण सोहळ्याला आलेले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आमदार खरात यांनी स्वतः खमंग मेजवानी दिली. अगदी स्वयंपाक गृहात जाऊन भाजीला फोडणी देऊन त्यांनी पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना जेवू घातलं.

सिद्धार्थ खरात यांनी बनवलं जेवण :मेहकर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या संजय रायमुलकर यांचा पराभव करत दमदार विजय मिळवल्यानंतर सिद्धार्थ खरात यांनी विधानभवनात आमदारकीची शपथ घेतली. दरम्यान यावेळी, कार्यकर्त्यांना सिद्धार्थ खरात यांचं नवं रूप पाहायला मिळालं. सिद्धार्थ खरात यांच्यासोबत मुंबईत आलेल्या मेहकर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांसाठी स्वतः खरात यांनी जेवण बनवलं.

आमदार सिद्धार्थ खरात जेवण करताना (Source - ETV Bharat Reporter)

जायंट किलर : कार्यकर्ते आपल्या नेत्यासाठी झटत असतात. मेहकर विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुरुंग लावणाऱ्या सिद्धार्थ खरात यांचा जायंट किलर म्हणून उल्लेख होत आहे. सिद्धार्थ खरात यांनी शपथ घेतल्यानंतर सोबत आलेल्या कार्यकर्त्यांसाठी स्वतः स्वयंपाकघर गाठलं आणि त्यांच्यासाठी स्वयंपाक करून त्यांना जेवण घातलं.

स्वयंपाक करतानाचा व्हिडिओ व्हायरल : आमदार सिद्धार्थ खरात मुंबईला गेले, त्यांच्यासोबत मेहकर मतदारसंघातील कार्यकर्तेही होते. सिद्धार्थ खरात यांचं मुंबईत घर असून त्यांच्या पत्नी देखील प्रशासकीय अधिकारी आहेत. दरम्यान, विधिमंडळाचं कामकाज आटोपल्यानंतर सिद्धार्थ खरात कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईतील घरी गेले. खरात यांच्या पत्नी नोकरीनिमित्त बाहेर असल्यानं खरात यांनी स्वतःच्या हातानं कार्यकर्त्यांसाठी जेवण बनवलं. शिवसेनेचे मेहकर तालुकाप्रमुख निंबाजी पांडव यांच्या शेतातून सोबत नेलेली फुलगोबीची भाजी खरात यांनी बनवली. यावेळी स्वयंपाक बनवत असताना एका कार्यकर्त्यानं खरात यांचा व्हिडिओ काढला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा

  1. नितेश राणेंच्या बेताल वक्तव्याला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे का? विरोधकांचा सवाल
  2. माजी पोलीस महासंचालक संजय पांडेंच्या अडचणीत वाढ; आज ठाणे गुन्हे शाखा करणार कसून चौकशी
  3. शरद पवारांबाबत गोपीचंद पडळकरांनी केलेल्या वक्तव्याची पक्ष गंभीर दखल घेणार, चंद्रशेखर बावनकुळेंचा खुलासा
Last Updated : 9 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details