महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संतोष देशमुख हत्या प्रकरण; विष्णू चाटेला 'या' तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी - SANTOSH DESHMUKH MURDER CASE

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या प्रकरणात विष्णू चाटेच्या (Vishnu Chate) सीआयडी कोठडीत आणखी वाढ करण्यात आली आहे.

Vishnu Chate
विष्णू चाटे (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 13, 2025, 8:11 PM IST

बीड: संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विष्णू चाटेला (Vishnu Chate) दोन दिवसापूर्वी केज न्यायालयात हजर केलं होतं. मात्र, न्यायालयानं त्यांना दोन दिवसाची सीआयडी कोठडी सुनावली. त्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर करण्यास सांगितलं होतं. मात्र आज न्यायालयानं विष्णू चाटे याला न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.

18 जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी : न्यायालयात दोन्ही वकिलाकडून व्यक्तिवाद करण्यात आला. यामध्ये विष्णू चाटेनं जो मोबाईल वापरला, तो मोबाईल कुठं आहे? तो मोबाईल विष्णू चाटेला पकडलं त्यावेळेस त्यांच्याकडं नव्हता, अशी माहिती त्यावेळेस स्थानिक गुन्हे शाखेनं दिली. तो मोबाईल कुठंतरी फेकण्यात आला आहे का? आणि या मोबाईलचा आणि विष्णू चाटे आणि इतर आरोपींचं काय कनेक्शन आहे, हे सर्व या मोबाईलमध्ये लपलं आहे. विष्णू चाटेला पुन्हा एकदा न्यायालयानं 18 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विष्णू चाटेचा कोठडीत मुक्काम वाढला आहे.

धनंजय देशमुख याचं 'सिनेस्टाईल आंदोलन' : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आठ आरोपींपैकी सात आरोपी हे स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केले आहेत. मात्र कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही फरार आहे. त्यामुळं या आरोपीला तत्काळ अटक करा, या मागणीसाठी मस्साजोग इथं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज 'सिनेस्टाईल आंदोलन' केलं. यावेळी पोलीस प्रशासनाबरोबरच सीआयडीचे अधिकारी, खासदार बजरंग सोनवणे, मनोज जरांगे उपस्थित होते. या मारेकऱ्याला लवकरात लवकर अटक करावी आणि वाल्मिक कराडला मकोका लावावा, अशी मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली.

हेही वाचा -

  1. धनंजय देशमुख यांचं 'शोले स्टाईल' आंदोलन मागे, मनोज जरांगे आणि पोलिसांनी केली विनंती
  2. वाल्मिक कराडवर 'मकोका' लागू करा, अन्यथा टॉवरवरून आंदोलन-धनंजय देशमुख यांचा इशारा
  3. 'सरकार प्रोटेक्शन मनी घेतंय का?' संतोष देशमुख हत्या प्रकरणात संजय राऊतांचा सवाल

ABOUT THE AUTHOR

...view details