मुंबई Police Recruitment Process:पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात 19 जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. महाराष्ट्र पोलीस दलात विविध १७ हजार पदे रिक्त होती. यासाठी १७ लाख ७६ हजार २५६ अर्ज आलेले आहेत. याविषयी पोलीस अधिकारी राजकुमार व्हटकर म्हणाले की, कारागृह भरतीही आम्ही करत असतो. १ हजार ८०० पदासाठी ३ लाख ७२ हजारहून अधिक अर्ज आलेले आहे. लोकसभा निवडणुकीमुळे ही भरती करणं शक्य नव्हतं. मात्र, १९ जून पासून भरती प्रक्रिया होणार आहे.
दोन वेगवेगळ्या पदासाठी अर्ज करण्याची मुभा :१९ जून पासून भरती प्रक्रियेदरम्यान लेखी परीक्षा, मैदानी परीक्षा प्रत्येक जिल्ह्यात होणार आहेत. जाहिरातीत आम्ही एक गोष्ट स्पष्ट दिली होती. दोन ठिकाणी अर्ज करू शकत नाही. मात्र, दोन वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करू शकतो. विविध पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची मैदानी परीक्षा एकाच दिवशी येणार नाही. त्यांना त्यात सुटं देण्यात आलेली नाही, अशी माहिती प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी दिली आहे.
भरती प्रक्रिया पारदर्शक :भरती प्रक्रियेत शासनाने दिलेल्या आदेशानुसार भरती प्रक्रिया होतं आहेत. ज्या ठिकाणी पाऊस पडत असेल त्या ठिकाणी भरती प्रक्रिया थांबवली जाईल. ही भरती प्रक्रिया दुसऱ्या दिवशी पाऊस नसेल त्या दिवशी घेतली जाईल. भरती प्रक्रिया पारदर्शक आणि मेरिट बेसेड होते. यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा फ्रॉड असं केलं जात नाहीत. असं आतापर्यंत झालेलं नाही आणि महाराष्ट्र पोलीस दलाची ही उज्वल परंपरा ठेवणार आहोत, अशी माहिती प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.