महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोली जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस; पर्लकोटा नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला - Gadchiroli Rain - GADCHIROLI RAIN

Gadchiroli Rain : जिल्ह्यात रात्रीपासून सर्वत्र मुसळधार पाऊस पडल्यानं अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. यामुळं आलापल्ली-भामरागड मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर, भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीला पूर (Pearlkota River) आला आहे.

Heavy Rain In Gadchiroli District
गडचिरोली जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 20, 2024, 11:00 PM IST

गडचिरोली Heavy Rain In Gadchiroli :जिल्ह्यात दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळं अनेक मार्ग बंद झाले आहेत. भामरागड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. गडचिरोली सीमेलगत छत्तीसगड राज्यातील जगदलपूर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडल्यानं गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड जवळून वाहणारी इंद्रावती, पर्लकोट, पामुलगौतम नदी दुथडी भरुन वाहत आहे. पर्लकोटा नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्यानं आलापल्ली-भामरागड रस्ताही बंद झाला आहे. त्यामुळं भामरागड येथील बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. तसेच 50 घरामध्ये पाणी शिरले. आणकी काही घरे धोकाच्या पातळीवर असून त्यांचा सामान सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.

गडचिरोली जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस (ETV Bharat Reporter)

जनजीवन विस्कळित : गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेकडील काही तालुक्यातील मुख्यामार्गावरुल अनेक नाल्यावर नवीन पुलांचे बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणी वळणरस्ता वाहून गेला होता. त्यामुळं काल दिवसभर वाहतूक ठप्प झाली होती. जिल्ह्यात सुरु असलेल्या पाऊसामुळं जनजीवन विस्कळित झालं होतं.

पर्लकोटा नदीला पूर :आज गडचिरोली जिल्ह्यात छत्तीसगढ सीमेलागत जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळं छत्तीसगढवरुन येणारी भामरागड लगतच्या पर्लकोटा नदीला पूर आला. त्यामुळं तालुक्यातील अनेक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला. तसेच पुराचे पाणी भामरागड शहरात शिरले. आणखी काही घरांमध्ये पाणी शिरण्याची स्थिती निर्माण झाली आहे. धोकादायक घरांचे नागरिक सुरक्षित स्थळी सामानासहित हालवण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून तालुका प्रशासनाच्या वतीनं तहसीलदार किशोर बागडे, नायब तहसीलदार प्रकाश पुप्पलवार, नायब तहसीलदार रेखा वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश दिले आहेत.

समुह निवासी शाळेत आणि कस्तुरीबा गांधी शाळेत पुरग्रस्त लोकांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच भामरागड पोलीस प्रशासनाच्या वतीनं एसडीपीओ अमर मोहीते, ठाणेदार दिपक डोंब यांनी स्वतः हाजर राहून पोलिस अमलदारांना पूर स्थळी हजर राहून गरजे नुसार मदतीला तयारी राहा असे सुचवले आहे. सुरक्षेच्यादृष्टीने आज 10 वाजल्या पासून जस जस पाणी वाढत आहे तसं पोलिस प्रशासनाकडून पोलीस जवान पुराच्या स्थळी तैनात करण्यात आले आहे. कोणी सेल्फी घेणार नाही नदीच्या पहायला जाणार नाही यांची दक्षता घेण्यात येत आहे.

हेही वाचा -

  1. मुंबईसह उपनगरात मध्यरात्रीपासून पावसाचं थैमान; रस्ते जलमय, लोकल सेवाही ठप्प - Mumbai Rain Update
  2. सातारा जिल्ह्याला पावसाने झोडपलं, पुढील २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा - Heavy rain in Satara
  3. सिंधुदुर्गसह रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट; मुसळधार पावसाचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर - Ratnagiri Weather Forecast

ABOUT THE AUTHOR

...view details