महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज; बंदोबस्तासाठी 15 हजार पोलीस तैनात - Ganeshotsav 2024 - GANESHOTSAV 2024

Ganeshotsav 2024 : गणेशोत्सव 2024 काळात शहरात ठिकठिकाणी विराजमान झालेल्या बाप्पाच्या दर्शनासाठी लाखो भाविक घराबाहेर पडतात. नागरिक मोठ्या संख्येनं येत असल्यानं त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी शहरात 15 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय.

Ganeshotsav 2024
मुंबई पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्था (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 7, 2024, 7:33 AM IST

मुंबई Ganeshotsav 2024 :आजपासून गणपती उत्सवाला सुरुवात होत असून, या उत्सवासाठी मुंबई पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था केलीय. उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. मुंबई सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी याबाबत माहिती दिलीय.

15 हजार पोलीस तैनात :7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या कालावधित गणपती उत्सवादरम्यान सुमारे 15 हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती सत्यनारायण चौधरी यांनी दिली. 32 पोलीस उपायुक्त, 45 सहायक पोलीस आयुक्तांसह 2 हजार 435 पोलीस अधिकारी आणि 12 हजार 420 कर्मचारी तैनात राहणार. याशिवाय एसआरपी प्लाटून, रॅपिड ॲक्शन फोर्स, दंगल नियंत्रण पथक, डेल्टा कॉम्बॅट, होमगार्ड आणि सामाजिक संस्थांचे हजारो स्वयंसेवकही सहकार्य करणार आहेत. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. विशेष शाखेचे पोलीस कर्मचारी साध्या वेशात तैनात असतील.

मुंबईत अंदाजे 10 हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक या मंडळांमध्ये येतात. यावेळी मुंबईतील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. यासोबतच विविध धार्मिक संस्थांचे स्वयंसेवक, एनसीसी, विविध कंपन्यांचे स्वयंसेवकही मुंबई पोलिसांना सुरक्षेसाठी मदत करतील.

आपत्कालीन मदतीसाठी संपर्क साधण्याचं आवाहन :सुरक्षा कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचं आणि जास्त गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन मुंबई पोलिसांनी जनतेला केलंय. महिला, लहान मुलं तसेच वृद्धांची सुरक्षा ही मुंबई पोलिसांची प्राथमिक जबाबदारी आहे. मुली आणि महिलांच्या छेडछाडीच्या घटनांबाबत मुंबई पोलीस सतर्क राहतील. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना कोणत्याही संशयास्पद किंवा बेवारस वस्तूची माहिती ताबडतोब पोलिसांकडं देण्याचा सल्ला दिला. कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन मदतीसाठी जनतेनं पोलीस हेल्पलाइन 100 किंवा 112 वर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं.

हेही वाचा

  1. कोल्हापुरातील दोन मित्रांची कमाल, कार्यशाळेतून घडवले गणपती कलाकार - Ganeshotsav 2024
  2. 'अंधेरीचा राजा' यंदा पाटवा हवेलीत होणार विराजमान; नवसाला पावणाऱ्या गणपतीचं विसर्जन करतात संकष्टीला - Ganeshotsav 2024
  3. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर 'या' राशींना मिळणार आनंदाची बातमी, वाचा राशीभविष्य - Horoscope 7 September 2024

ABOUT THE AUTHOR

...view details