महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्क्रीन गार्डच्या वादातून अल्पवयीन मुलांकडून दुकानदाराचा खून - MURDER IN SANGLI

पन्नास रुपयांच्या किंमतीच्या स्क्रीन गार्डच्या वादातून मोबाईल दुकानदाराचा खून केल्याची घटना सांगलीमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे.

MURDER IN SANGLI
घटनास्थळी तपास करताना पोलीस (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 26, 2025, 5:29 PM IST

Updated : Jan 26, 2025, 6:17 PM IST

सांगली :अवघ्या पन्नास रुपयाच्या मोबाईल स्क्रीन गार्ड खरेदीच्या वादातून एका तरुणाचा सांगली मध्ये निर्घृण खून करण्यात आला आहे. विपुल अमृतपुरी गोस्वामी असं खून झालेल्या मोबाईल दुकानदार तरुणाचं नाव आहे. शहरातल्या मध्यवर्ती बस स्थानकावरील मोबाईल शॉपीमध्ये हा प्रकार घडला आहे.

धारदार शस्त्रांनी वीस ते पंचवीस वार :मोबाईलचं स्क्रीन गार्ड खरेदी करण्यासाठी काही तरूण दुकानात आले होते. यावेळी विपुलने मोबाईल स्क्रीन गार्डची किंमत शंभर रुपये सांगितली. खरेदीसाठी आलेल्या तरुणांनी पन्नास रुपयाला स्क्रीन गार्ड मागत वाद घालण्यास सुरुवात केली. या वादातून तीन ते चार तरुणांनी विपुलवर धारदार शस्त्रांनी वीस ते पंचवीस वार केले. यात विपुलचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

माध्यमांबरोबर बोलताना उपअधीक्षक विमला एम (ETV Bharat Reporter)

तपासाची चक्रे फिरवत गुन्हागारांना अटक :घटनेची माहिती मिळतात शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासाची चक्रे फिरवत शहर पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच समितीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह पोलीस फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला होता. त्यानंतर संदीप घुगे यांनी घटनेचा आढावा घेत तातडीनं तपास करण्याच्या सूचना दिल्या. या खुनाच्या घटनेबाबत शहर पोलीस उपाधीक्षक विमल एम. म्हणाल्या की, सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास भैरवनाथ मोबाईल शॉपी इथं काही तरुण मोबाईल स्क्रीन गार्ड खरेदीसाठी गेले होते. यावेळी खरेदी करणारे अल्पवयीन मुले आणि मोबाईल दुकानदार विपुल गोस्वामी यांच्यात मोबाईल स्क्रीन गार्डच्या दरावरून वाद झाला. यानंतर अल्पवयीन तरुणांनी विपुल गोस्वामीवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यात विपुल गंभीर जखमी झाला. मात्र, काही वेळातच विपुलचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून सूत्रांनी माहितीनंतर गतीनं तपास करत आहेत. यामध्ये पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती उपअधीक्षक विमल एम. यांनी दिली.

घटनास्थळी तपास करताना पोलीस (ETV Bharat Reporter)

हेही वाचा :

  1. शक्तिपीठ महामार्गाचा कोल्हापूर, सांगलीतून 'खडतर' प्रवास; शेतकऱ्यांचा वाढता विरोध फडणवीस सरकार थोपवणार का?
  2. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयानं कोल्हापूर आणि सांगलीकर धास्तावले, पुन्हा पडणार महापुराचा विळखा?
Last Updated : Jan 26, 2025, 6:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details