महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भागवत सप्ताहामध्ये 300 हून अधिक भाविकांना भगरीतून विषबाधा; लोणार तालुक्यातील घटना - जया एकादशी

Food Poisoning In Mahaprasad : उपवासादरम्यान प्रामुख्याने भगर खाल्ली जाते. मात्र, हिच भगर भाविकांच्या जीवावर उठली असल्याचं चित्र लोणार तालुक्यात पाहायला मिळाले. मंगळवारी जया एकादशी दिवशी भगर खाल्ल्यामुळे सुमारे ३०० हून अधिक भाविकांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडलीय.

Food Poisoning
भाविकांना विषबाधा

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 21, 2024, 12:50 PM IST

बुलडाणा येथे भाविकांना भगरीतून झाली विषबाधा

बुलडाणा Food Poisoning In Mahaprasad: लोणार तालुक्यातील सोमठाणा येथे भागवत सप्ताह सुरू आहे. दरम्यान मंगळवारी एकादशी असल्यानं रात्री भाविकांना भगरचा भात आणि शेंगदाणा आमटी फराळ म्हणून देण्यात आला होता. हा प्रसाद खाल्लानंतर रात्री अनेकांना उलट्या सुरू झाल्या. यात सोमठाणा खापरखेड आणि आजूबाजूच्या गावातील भक्तांना विषबाधा झालीय. एकूण २०० भाविकांवर बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अनेकांना इतरत्र उपचारार्थ हलवण्यात आलं आहे. तर विषबाधित रुग्णांची नावे कळू शकली नाहीत.

काय आहे नेमकं प्रकार : लोणार तालुक्यातील खापरखेड सोमठाणा येथील विठ्ठल -रुक्मिणीच्या मंदिरातील फराळ खाल्ल्यानं गावातील तब्बल 300 पेक्षा जास्त भाविकांना विषबाधा झालीय. रुग्णांना मेहेकर, सुलतानपूर, लोणार, अंजनी खुर्द या ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. या घटनेनं परिसरात प्रचंड भितीचं वातावरण निर्माण झालंय. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी गैरहजर होते. त्यामुळं पोलीस आणि महसूल प्रशासनाने परिसरातील खासगी डॉक्टरांना वैद्यकीय उपचारासाठी पाचारण केलं.

विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रसाद वाटप: मंगळवारी रात्री उशिरा हा धक्कादायक प्रकार घडला. लोणार येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मंगळवारी उपवासाच्या फराळाचं प्रसाद वाटप करण्यात आलं होतं. हा प्रसाद खाल्ल्यानंतर काही वेळातच अनेकांना उलट्या, पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळं गावात प्रचंड घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

आरोग्य विभागाचा गलथान कारभार : धक्कादायक बाब अशी की, या ग्रामीण रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्यानं रुग्णांना जमिनीवर झोपून उपचार देण्यात आले. पोलीस आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी जीवितहानी होऊ नये यासाठी प्रयत्न करत असताना, आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आलाय. सकाळपर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा -

  1. शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दुधातून विषबाधा
  2. सुवासिनीच्या कार्यक्रमात पुरणपोळीचं जेवण भोवलं; 35 महिलांना झाली विषबाधा
  3. भगर आमटीचा प्रसाद भोवला; नांदेडमध्ये महाप्रसादातून एक हजारहून अधिक भाविकांना विषबाधा

ABOUT THE AUTHOR

...view details