सातारा Satara Suicide News : सध्या दोन धक्कादायक घटना कराडमध्येघडल्या आहेत. कराड तालुक्यातील ओंड गावात डॉक्टरने राहत्या घरातील दवाखान्यात आत्महत्या (Doctor Committed Suicide) केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आलीय. तर दुसऱ्या घटनेत पाय घसरून पडल्याने २२ वर्षांच्या तरूणीचा मृत्यू झाला आहे. ती वैद्यकीय अभ्यासक्रमाची विद्यार्थीनी होती.
खासगी सावकार, फायनान्स कंपनीचा तगादा :कराड तालुक्यातील ओंड गावात डॉ. हेमंत प्रभाकर रेळेकर (वय ५०) यांनी आपल्या दवाखान्यातच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. ओंडोशी रस्त्यावर त्यांचे 'रेळेकर हॉस्पिटल' आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ते आई, पत्नी, मुलगा आणि मुलगीसोबत राहात होते. खासगी सावकाराचे पैसे देण्यासाठी त्यांनी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलं होतं. सावकार आणि कंपनीकडून पैशासाठी तगादा सुरू होता. त्यातूनच त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या पत्नीन केला आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तरूणीचा मृत्यू : मूळची उत्तर प्रदेशमधील असणारी २२ वर्षीय तरूणी कराडच्या कृष्णा मेडिकलमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होती. मलकापूरमधील सनसिटीमध्ये ती वास्तव्यास होती. मंगळवारी (३० जुलै) रात्री पाय घसरून पडल्याने ती गंभीररित्या जखमी होवून तिचा मृत्यू झाला. आरूषी मिश्रा, असं तिचं नाव आहे. याबाबतच कराड शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
पोलीस तपास सुरू :वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस तपास सुरू आहे, अशी माहिती कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
हेही वाचा -
- भाजपा आमदार श्वेता महाले यांच्या बॉडीगार्डनं केली आत्महत्या... - Buldhana Suicide News
- झटपट श्रीमंत होण्यासाठी घेतला रमी गेमचा आधार, पण झाला कर्जबाजारी; शेवटी... - Youth Suicide Case Thane
- 14 वर्षांनी बाप झाल्याचा आनंद, पण गरिबीनं घात केला; रुग्णालयाच्या बिलामुळे जुळ्या मुलांच्या वडिलांची आत्महत्या - Navi Mumbai Crime