पुणेFree Education For Trnasgender : गेल्या काही वर्षांपासून तृतीयपंथीयांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागत होता. तृतीयपंथीयांना शिक्षणात सामावून घेण्याच्या हेतूने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आलं आहे. तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक टक्का वाढावा हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे. तृतीयपंथी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च विद्यापीठ निधीतून करण्यात येणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना तृतीयपंथी (ETV Bharat Reporter) शासनाचा निर्णय उत्तम :याबाबत तृतीयपंथी म्हणाले की, विद्यापीठाने जो निर्णय घेतला आहे तो खूपच चांगला निर्णय आहे. आज अनेक तृतीयपंथी असे आहेत की, ज्यांना शिक्षणाचा अभाव असल्याने रोजगाराच्या संधी मिळत नाहीत. तसेच अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. पण आता जो काही निर्णय घेण्यात आला आहे, तो खूपच चांगला आहे. फक्त विद्यापीठानं हे जाहीर करावं की प्राथमिक, माध्यमिक की उच्च माध्यमिक शिक्षणामधील कोणतं शिक्षण हे देण्यात येणार आहे, हे जाहीर करावं असं यावेळी सांगण्यात आलं आहे.
तृतीयपंथीयांसाठी सकारात्मक निर्णय :तृतीयपंथी म्हटले की, त्यांना समाजात तिरस्काराच्या नजरेनं पाहिल्या जातं. अनेक तृतीयपंथीयांना त्यांचा परंपरागत व्यवसाय सोडून उच्च शिक्षण घ्यावं आणि कर्तृत्व गाजवावं असं वाटतं. यासाठी आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार विद्यापीठाशी संलग्न शिक्षण संस्थांमध्ये यंदाच्या वर्षापासून तृतीयपंथी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण घेता येणार आहे. विद्यापीठाच्या या निर्णयाचे तृतीयपंथी तसेच युतक चॅरिटेबल ट्रस्ट कडून स्वागत करण्यात आले आहे.
हेही वाचा :
- एक्झिट पोलनंतरही रवींद्र धंगेकरांचा कॉन्फिडन्स; म्हणाले, "4 तारखेला पुणेकरांचा...." - lok sabha election result
- राज्यातील 48 मतदारसंघांत कोण मारणार बाजी? तुमच्या भागाचा कोण खासदार? जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट - Lok Sabha Election 2024
- "उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीत..."; लोकसभा निकालाच्या काही तासाआधी शिवसेनेच्या बड्या नेत्याचा दावा - Uddhav Thackeray Mahavikas Aghadi